​रेडी फेम असिनला झाली मुलगी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2017 10:18 IST2017-10-25T04:48:59+5:302017-10-25T10:18:59+5:30

असिनने अनेक दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम केले आहे. दक्षिणेत यश मिळाल्यानंतर असिन बॉलिवूडकडे वळली. गजनी या चित्रपटाद्वारे तिने बॉलिवूडमध्ये एंट्री ...

Ready fame Asin was the daughter | ​रेडी फेम असिनला झाली मुलगी

​रेडी फेम असिनला झाली मुलगी

िनने अनेक दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम केले आहे. दक्षिणेत यश मिळाल्यानंतर असिन बॉलिवूडकडे वळली. गजनी या चित्रपटाद्वारे तिने बॉलिवूडमध्ये एंट्री केली. तिच्या या पहिल्याच चित्रपटाची चांगलीच चर्चा झाली होती. या चित्रपटातील तिची आणि आमिरची जोडी प्रेक्षकांना खूप आवडली होती. त्यानंतर असिनची जोडी लंडन ड्रीम्स आणि रेडी या चित्रपटात सलमान खानसोबत जमली. रेडी या चित्रपटातील ढिंकचिका हे गाणे तर प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले होते. असिनने त्यानंतर हाऊसफुल २, बोल बच्चन, ऑल इज वेल, खिलाडी ७८६ यांसारख्या चित्रपटातही काम केले. पण असिन गेल्या काही काळापासून चित्रपटांपासून दूर आहे. असिनने गेल्या वर्षी जानेवारीत मायक्रोमॅक्स कंपनीचा को-फाऊंडर राहुल शर्मासोबत लग्न केले होते. आता राहुल आणि असिनच्या आय़ुष्यात एका नन्ही परीचे आगमन झाले आहे आणि राहुलनेच ही गोष्ट मीडियाला सांगितली आहे. त्याने एका स्टेटमेंटद्वारे ही गोष्ट सगळ्यांना सांगितली आहे. त्याने त्याच्या स्टेटमेंट मध्ये म्हटले आहे की, माझ्या आणि असिनच्या आयुष्यात एका छोट्याशा राजकुमारीचे आगमन झाले असून आम्ही दोघेही प्रचंड खूश आहोत. गेले नऊ महिने हे आमच्यासाठी खूप खास होते. या प्रवासात जे सतत आमच्यासोबत होते, त्या आमच्या कुटुंबाचे आणि मित्रपरिवाराचे आम्ही आभार मानतो. 
असिन आणि राहुलची ओळख अभिनेता अक्षय कुमार मुळे झाली होती. असिनने अक्षयसोबत हाऊसफुल २, खिलाडी ७८६ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले होते. याच चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान अक्षय आणि असिनची खूप चांगली मैत्री जमली होती. अक्षय आणि राहुल एकमेकांना अनेक वर्षांपासून ओळखतात. त्यामुळे अक्षयनेच राहुल आणि असिनची ओळख करून दिली होती. त्यांच्या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. 
असिन सध्या बॉलिवूडच नव्हे तर दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये देखील काम करत नाहीये. लग्न झाल्यानंतर ती अभिनयक्षेत्रापासून दूर गेली आहे असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. सध्या ती तिचा सगळा वेळ तिच्या पती समवेत घालवत आहे. विशेष म्हणजे असिनचा २६ ऑक्टोबरला वाढदिवस असून तिला वाढदिवसाच्या दोन दिवस आधी खूप चांगले गिफ्ट मिळालेले आहे. 

Also Read : ‘हाऊसफुल्ल’ गँगमुळे असिन-राहुलचे घर ‘फुल्ल’!

Web Title: Ready fame Asin was the daughter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.