​‘या’ तारखेला असा सज्ज; येणार ‘बाहुबली2’चा ट्रेलर!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2017 12:21 IST2017-03-12T06:51:44+5:302017-03-12T12:21:44+5:30

‘बाहुबली2’चा ट्रेलर पाहण्यास तुम्ही उत्सूक असालच. तर आपल्या कॅरेंडरमध्ये १६ मार्च ही तारीख नोंदवून ठेवा. होय, येत्या गुरुवारी या ...

Ready on 'this' date; Trailer for 'Bahubali2' | ​‘या’ तारखेला असा सज्ज; येणार ‘बाहुबली2’चा ट्रेलर!!

​‘या’ तारखेला असा सज्ज; येणार ‘बाहुबली2’चा ट्रेलर!!

ाहुबली2’चा ट्रेलर पाहण्यास तुम्ही उत्सूक असालच. तर आपल्या कॅरेंडरमध्ये १६ मार्च ही तारीख नोंदवून ठेवा. होय, येत्या गुरुवारी या बहुप्रतिक्षीत चित्रपटाचा ट्रेलर रिलीज होणार आहे. त्यामुळे तुमचा आमचा सगळ्यांचीच ‘बाहुबली2’च्या ट्रेलरची प्रतीक्षा संपली आहे.

खरे तर गत जानेवारीतच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज होणार होता. मात्र शूटींग लांबल्याने ट्रेलरही लांबला. आता यासाठी १६ मार्चचा मुहूर्त ठरला आहे. यादिवशी सकाळी ९ वाजता ‘बाहुबली2’चा ट्रेलर आऊट होईल. यापूर्वी एक ग्रँड पे्रस कॉन्फरन्स होईल. याचदरम्यान ट्रेलर रिलीज होईल. 

काही दिवसांपूर्वी ‘बाहुबली2’चे मोशन पोस्टर आऊट झाले होते. विशेष म्हणजे, रिलीज होताच या मोशन पोस्टरवर प्रेक्षकांच्या अक्षरश: उड्या पडल्या होत्या. हे मोशल पोस्टर यु ट्यूबवर पाचव्या क्रमांकावर ट्रेंड करत होते. कालच दिग्दर्शक एस एस राजामौली यांनी ‘बाहुबली2’चे नवे पोस्टर रिलीज केले. या पोस्टरचे दोन भाग असून, वरच्या भागात कटप्पा अमेरेंद्र बाहुबलीला हातात घेऊन खेळवताना दिसत आहे, तर खालच्या भागात कटप्पा बाहुबलीला तलवारने मारताना दिसत आहे.  ‘कटप्पाने बाहुबलीला का मारले? हा यक्षप्रश्न गेल्या दोन वर्षांपासून उपस्थित झालेला आहे. ‘बाहुबली2’मध्ये याचाच उलगडा या भागात होईल, अशी अपेक्षा प्रेक्षक करीत आहेत. 
२०१५ मध्ये आलेल्या  ‘बाहुबली’ने धुमाकूळ घालत बॉक्स आॅफिसवर रेकॉर्डब्रेक  १०० कोटीहून अधिकची कमाई केली होती.  ‘बाहुबली: दी बिगीनिंग’मध्ये मुख्य भूमिका साकारणारा  प्रभास असो वा खलनायकाची भूमिका साकारणारा राणा डग्गुबती, या सगळ्यांनीच या चित्रपटाद्वारे अपार लोकप्रीयता मिळवली. आता प्रभाव व राणाला  ‘बाहुबली2’मध्ये पाहण्यास लोक उत्सूक आहेत. 

Web Title: Ready on 'this' date; Trailer for 'Bahubali2'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.