वाचा : सलमानला लग्नाची का वाटते भीती?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2016 14:15 IST2016-10-05T08:35:18+5:302016-10-05T14:15:23+5:30
सलमान खानचे अफेअर आणि लग्नाच्या वावड्या अधूनमधून उठत असतात. पण तरिही बॉलिवूडचा हा ‘दबंग’ खान कधी लग्न करणार? याची ...
(1).jpg)
वाचा : सलमानला लग्नाची का वाटते भीती?
स मान खानचे अफेअर आणि लग्नाच्या वावड्या अधूनमधून उठत असतात. पण तरिही बॉलिवूडचा हा ‘दबंग’ खान कधी लग्न करणार? याची सगळ्यांनाच प्रतीक्षा आहे. सलमानचे चाहते तर ही गोड बातमी ऐकण्यास आतूर झालेले आहे. अलीकडे सल्लूने त्याच्या लग्नाची तारीखही जाहिर केली होती. अर्थात ही तारीख जाहिर करतानाचा त्याचा मूड एकदम फनी होता. त्यामुळे ही तारीख किती खरी अन् किती खोटी, त्यालाच ठाऊक़ आता मात्र त्याने आणखीच एक खुलासा केला आहे. होय, मला लग्नाची भीती वाटते, असे सलमानने म्हटले आहे. काल-परवा सलमान एका ज्वेलरी स्टोअरच्या लॉन्चिंगला पोहोचला. यावेळी मीडियाशी बोलताना संपूर्ण जगातला मी सर्वाधिक रोमॅन्टिक व्यक्ति आहे, असे तो म्हणाला. आता इतक्या रोमॅन्टिक व्यक्तिने अद्याप लग्न का केले नाही? असा प्रश्न येणारच ना. नेमका हाच प्रश्न सलमानला विचारण्यात आला. यावर सलमान जे बोलला ते ऐकून सगळेच अवाक् झालेत. मला लग्नाची भीती वाटते. अंगठ्यांचा फोबिया आहे. कदाचित इतक्यांदा हृदय तुटल्याने असे झाले असावे. ही भीती माझ्या आत घर करून बसली आहे, असे सलमान म्हणाला. आता सलमानची ही भीती दूर करणारी कुणीतरी त्याला मिळो, एवढीच काय ती सदिच्छा!