​वाचा : राजकुमार हिराणी काय म्हणताहेत रणबीर कपूर-संजय दत्तच्या भांडणाबद्दल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2016 12:41 IST2016-12-24T10:49:27+5:302016-12-24T12:41:38+5:30

हे तर तुम्हाला माहितच आहे की, आगामी संजय दत्त बायोपिकमध्ये रणबीर कपूर ‘खलनायक’ स्टार संजूबाबाची भूमिका करणार आहे. ‘मुन्नाभाई ...

Read: Rajkumar Hirani is saying about Ranbir Kapoor and Sanjay Dutt's fight | ​वाचा : राजकुमार हिराणी काय म्हणताहेत रणबीर कपूर-संजय दत्तच्या भांडणाबद्दल

​वाचा : राजकुमार हिराणी काय म्हणताहेत रणबीर कपूर-संजय दत्तच्या भांडणाबद्दल

तर तुम्हाला माहितच आहे की, आगामी संजय दत्त बायोपिकमध्ये रणबीर कपूर ‘खलनायक’ स्टार संजूबाबाची भूमिका करणार आहे. ‘मुन्नाभाई सिरीज’, ‘३ इडियटस्’, ‘पीके’ फेम दिग्दर्शक राजकुमार हिराणी तो दिग्दर्शित करीत आहेत. मध्यंतरी संजय आणि रणबीरचे पटत नसल्याची चर्चा होती. एका पार्टीत दोघांचे भांडण झाल्याचेही वृत्त होते.

तसेच एका कार्यक्रमात संजयने रणबीरला टाळत असल्याचे सांगितले होते. त्यामुळे या दोघांमध्ये ‘आॅल ईज वेल’ नाही असे वाटू लागले. पण या सगळ्या प्रकराणाला फुल स्टॉप लावण्यासाठी अखेर हिराणींना पुढे यावे लागेल.

‘दंगल’च्या प्रीमियरला आलेल्या हिराणींनी पत्रकारांना उत्तर देताना म्हटले की, ‘रणबीर-संजयमध्ये वाद असल्याच्या बातम्या पूर्ण असत्य आहे. दोघांची खूप चांगली मैत्री असून संजय त्याला मदत करण्यासाठी खूप मदत करीत आहे. संजयचा स्वभावच मुळात मिश्किल आणि विनोदी आहे. रणबीरला टाळत असल्याची गोष्ट त्याच्या विनोदाचा एक भाग आहे. त्यामुळे या चर्चा थांबवा.’

या बायोपिकची घोषणा झाल्यापासूनच या दोन अभिनेत्यांमध्ये बिनसले असल्याचे बोलले जाऊ लागले. रणबीरच्या निवडीमुळे संजय दत्त खुश नाही. रणबीरचा स्वभाव आणि व्यक्तीमत्त्व त्याच्यासारखे नसल्यामुळे तो थोडासा चिंतीत आहे, अशी अफवा पसरली होती. मात्र नंतर दोघे अनेकदा एकत्र दिसल्यानंतर दोघांची बॉण्डिग एकदम स्ट्राँग आहे, असे दिसून आले.

दरम्यान एका पार्टीत संजयने रणबीरला खूप सतावले होते. त्याला ‘मर्द बनो’ असा सल्लाही दिला होता. त्याच्या मते, रणबीरने अक्षय कुमार आणि सलमान खानप्रमाणे फुल अ‍ॅक्शन चित्रपट करावेत. केवळ रोमॅण्टिक भूमिका करू नयेत. एक अ‍ॅक्टर म्हणून विविध प्रकारच्या भूमिका स्वीकारण्याचे धाडस त्याने दाखवावे. त्याच्या अशा स्पष्टोक्तेपणामुळे रणबीर चांगलाच दुखावला गेला होतो.

नंतर दिल्लीतील एका कार्यक्रमात संजय म्हणाला होता की,‘ रणबीर माझी भूमिका करतोय पण त्याची एक गोष्ट माझ्यासाठी मोठी अडचण ठरत आहे. तो मला रोज फोन करतो, माझ्यासोबत दिवसभर राहण्याची मागणी करतो. मी तर कोणासोबत अर्ध्या तासापेक्षा जास्त नाही राहू शकत. त्यामुळे मी त्याला टाळण्याचा प्रयत्न करतो. हा रोल त्याच्यासाठी अवघड आहे.’

Web Title: Read: Rajkumar Hirani is saying about Ranbir Kapoor and Sanjay Dutt's fight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.