वाचा : पूजा भट्टचा धाडसी प्रोजेक्ट नेमका काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2016 17:39 IST2016-06-11T12:09:50+5:302016-06-11T17:39:50+5:30
पूजा भट्ट बॉलिवूडमधून पूर्णपणे गायब झाली, असे तुम्हाला वाटत असेल तर ते खरे नाही. कारण पूजा सध्या एका नव्या ...

वाचा : पूजा भट्टचा धाडसी प्रोजेक्ट नेमका काय?
प जा भट्ट बॉलिवूडमधून पूर्णपणे गायब झाली, असे तुम्हाला वाटत असेल तर ते खरे नाही. कारण पूजा सध्या एका नव्या प्रोजेक्टवर काम करतेय. या नव्या प्रोजेक्टबद्दल ऐकाल तर तुम्हीही अवाक् व्हाल. सध्या पूजा एका वेब सीरिजवर काम करतेय. ही वेब सीरिज म्हणजे, स्त्री-पुरूषांच्या संबंधातून मिळणारे ‘सुख’(आॅर्गेज्म)वर आधारित आहे. एका मुलाखतीत पूजानेच याबाबत माहिती दिली. आपल्या देशात आजही स्त्री-पुरूष संबंधांवर बोलताना लोक संकोचतात. महिला तर याबाबत अवाक्षरही काढायला लाजतात. असेही काही ‘सुख’ असते, हेच अनेक महिलांना ठाऊक नसते. माझ्या वेब सीरिजमध्ये याच गोष्टीवर भाष्य केले आहे, असे पूजाने सांगितले. या वेब सीरिजसाठी पूजाने म्हणे खूप रिचर्स केला आहे. विशेष म्हणजे या वेबसीरिजमध्ये अनेक अॅक्ट्रेसेसही त्यांचे अनुभव शेअर करणार आहेत. म्हणजे या वेब सीरिजमध्ये केवळ सामान्य महिला नाही तर बॉलिवूड अॅक्ट्रेसेसही त्यांचा अनुभव शेअर करताना दिसणार आहेत.