Video : डबडबलेल्या डोळ्यांनी रवीनाने वडिलांच्या पार्थिवाला दिला मुखाग्नी, पाहून तुमचेही डोळे पाणावतील
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2022 18:25 IST2022-02-11T18:14:37+5:302022-02-11T18:25:26+5:30
Raveena Tandon Father Ravi Tandon Passed Away : रवीनाचे फोटो व व्हिडीओ समोर आले आहेत. यात रवीना वडिलांचे अंत्यविधी पार पाडताना दिसतेय. डबडबलेल्या डोळ्यांनी रवीनाने वडिलांना निरोप दिला.

Video : डबडबलेल्या डोळ्यांनी रवीनाने वडिलांच्या पार्थिवाला दिला मुखाग्नी, पाहून तुमचेही डोळे पाणावतील
Raveena Tandon Father Ravi Tandon Passed Away : बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडनचे (Raveena Tandon) वडील रवी टंडन (Ravi Tandon) यांचं आज (११ फेब्रुवारी) निधन झालं. रवीनाने स्वत: सोशल मीडियावर ही माहिती दिली. दुपारी रवीनाच्या वडिलांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यादरम्यानचे रवीनाचे फोटो व व्हिडीओ समोर आले आहेत.
यात रवीना वडिलांचे अंत्यविधी पार पाडताना दिसतेय. डबडबलेल्या डोळ्यांनी रवीनाने वडिलांना निरोप दिला.
वडिलांच्या निधनानंतर रवीनाने त्यांच्यासोबतचे अनेक जुने फोटो सोशल मीडियावर शेअर करत एक भावुक पोस्ट शेअर केली होती.
(साभार)
‘तुम्ही नेहमी माझ्यासोबत असाल. मी नेहमी तुमच्यासारखीच राहीन. मी तुम्हाला कधीही जाऊ देणार नाही. लव्ह यू बाबा,’असं तिने कॅप्शनमध्ये लिहिलं होतं.
रवीनाचे वडिल रवी टंडन दिग्दर्शक होते. अमिताभ बच्चन यांच्या मजबूर आणि खुद्दार या सिनेमांचं रवी यांनी दिग्दर्शन केलं होतं. अनहोनी आणि खेल खेल में हे सिनेमेही त्यांनी दिग्दर्शित केले होते. आरके नय्यर यांचे सहाय्यक म्हणून त्यांनी काम करण्यास सुरुवात केली.
(साभार)
दिग्दर्शनातील बारकावे शिकल्यानंतर रवी यांनी दिग्दर्शक म्हणून करिअरला सुरूवात केली. अनहोनी हा त्यांनी दिग्दर्शित केलेला पहिला चित्रपट. या चित्रपटातील संजीव कुमारच्या अभिनयाचे आजही कौतुक होते. यानंतर त्यांनी ऋषी कपूर यांच्यासोबत ‘खेल खेल में’ हा चित्रपट बनवला. अक्षय कुमारचा ‘खिलाडी’ या चित्रपटाचा रिमेक आहे. रवी टंडन यांनी वीणा यांच्याशी लग्न केलं. त्याना रवीना आणि राजीव ही दोन मुलं आहेत. रवीना अभिनेत्री आहे तर राजीव दिग्दर्शक आणि निर्माता आहेत.