​रवीना टंडनने शेअर केला 90च्या दशकातील गर्ल गँगचा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2017 16:26 IST2017-02-08T10:56:05+5:302017-02-08T16:26:05+5:30

१९९० च्या दशकातील ‘दिलवाले, मोहरा, अंदाज अपना अपना या सारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांमध्ये रविनाने मुख्य भूमिका साकारल्या होत्या. त्यावेळीच्या सर्वच मोठ्या कलावंतासोबत रविनाने काम केले आहे.

Raveena Tandon shared the photo of Girl Gang of the 90's | ​रवीना टंडनने शेअर केला 90च्या दशकातील गर्ल गँगचा फोटो

​रवीना टंडनने शेअर केला 90च्या दशकातील गर्ल गँगचा फोटो

९०च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री रवीना टंडन आगामी ‘द मदर’ या चित्रपटात मुख्य भूमिके त झळकणार आहे. महिलांवर आधारित हा चित्रपटाच्या निमित्ताने आपल्या जमान्यातील आघाडीच्या अभिनेत्रींसह ‘स्टारडस्ट’ या मॅगझिनने कव्हरपेजवर प्रसिद्ध केलेला फोटो रविनाने सोशल मीडियावर शेअर केला आहे. 

अभिनेत्री रविना टंडन हिने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून पूजा भट्ट, उर्मिला मातोंडकर, करिश्मा कपूर यांच्यासह १९९१ साली स्टारडस्ट या मॅगझिनच्या कव्हरपेजवर प्रसिद्ध केलेला फोटो शेअर केला आहे. स्टारडस्टने हा फोटो ‘रिबिलिअस : ऐज आॅफ अ‍ॅक्युरिअस’ या मथळ्याखाली प्रकाशित केला होता. फोटोवर रविना टंडन हिने #throwback90s #magicalera #girlgang90s,असे कॅप्शन दिले आहे. रविनाच्या मते ९० चे दशक त्यांच्यासाठी मॅजिक इरा होते. या चारही अभिनेत्रींनी ९० च्या दशकात आपल्या अभिनयाला सुरुवात केली होती. सुमारे एक दशक या अभिनेत्रींचा जलवा बॉलिवूड व चाहत्यांनी अनुभवला होता. या फोटोमधील चारही अभिनेत्री बॉलिवूडच्या संपर्कात आहे. पूजा भट्ट हिने निर्मिती क्षेत्रात पाऊल ठेवले आहे. करिश्मा कपूर व उर्मिला मातोंडकर जाहिरातीमध्ये व्यस्त आहे. रविना टंडन अधामधातून चित्रपटात झळकत आली आहे. 



१९९० च्या दशकातील ‘दिलवाले, मोहरा, अंदाज अपना अपना या सारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांमध्ये रविनाने मुख्य भूमिका साकारल्या होत्या. त्यावेळीच्या सर्वच मोठ्या कलावंतासोबत रविनाने काम केले आहे. रवीना टंडन आगामी ‘द मदर’ या हिंदी चित्रपटातून कमबॅक करणार आहे.  महिलाविश्व, त्यांच्या अडचणी, समस्या, केसेस यांच्यावर आधारित हा चित्रपट असून, प्रेक्षकांच्या हृदयाला हात घालणारे कथानक असल्याचे कळतेय. या चित्रपटाची शूटिंग पूर्ण झाली असून लवकर प्रदर्शित केला जाणार आहे. 

">http://

Web Title: Raveena Tandon shared the photo of Girl Gang of the 90's

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.