रवीना टंडनने सांगितला दाक्षिणात्य फिल्म इंडस्ट्री आणि बॉलिवूडमधील मोठा फरक, म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2024 09:30 AM2024-05-22T09:30:25+5:302024-05-22T09:32:26+5:30

अलीकडेच अभिनेत्रीने दाक्षिणात्य आणि बॉलिवूड इंडस्ट्रीमधला मोठा फरक दाखवून दिला आहे.

Raveena Tandon reveals the big difference between the southern film industry and Bollywood | रवीना टंडनने सांगितला दाक्षिणात्य फिल्म इंडस्ट्री आणि बॉलिवूडमधील मोठा फरक, म्हणाली...

रवीना टंडनने सांगितला दाक्षिणात्य फिल्म इंडस्ट्री आणि बॉलिवूडमधील मोठा फरक, म्हणाली...

बॉलिवूडची 'मस्त गर्ल' असणारी अभिनेत्री रवीना टंडन आजही आपल्या सौंदर्याने अनेकांना घायाळ करते. ९० च्या दशकात असलेली रवीनाची जादू आजही कमी झालेली नाही. मोठ्या ब्रेकनंतर रवीनाने दाक्षिणात्य चित्रपट आणि ओटीटीच्या माध्यमातून पुन्हा एकदासिनेसृष्टीत कमबॅक केलं आहे. रवीनाने बॉलिवूडसह साऊथमध्ये काम केलं आहे. अलीकडेच अभिनेत्रीने दाक्षिणात्य आणि बॉलिवूड इंडस्ट्रीमधला मोठा फरक दाखवून दिला आहे.

नुकतेच राजश्री अनप्लग्डशी बोलताना रवीना टंडनने साऊथ इंडस्ट्रीबद्दल काही खास गोष्टी सांगितल्या. दाक्षिणात्य इंडस्ट्रीमध्ये छोट्या टीमसोबत अत्यंत चांगल्याप्रकारे काम केलं जातं, तर बॉलिवूडमध्ये त्याच कामासाठी अधिक लोकांची गरज असते, असं ती म्हणाली.  यावेळी तकदीरवाला (1995)  चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानची एक आठवण तिनं सांगितली. 

अगदी छोट्या टीमसोबत सिनेमातील जवळपास अर्धी गाणी परदेशात शूट झाली होती, असं तिनं सांगितलं. रवीना म्हणाली,  'साऊथच्या कमी बजेटच्या चित्रपटांमध्येही मला कोणतीही कमतरता भासली नाही. कमी बजेटमध्येही साऊथ इंडस्ट्री कशी चांगली काम करते, हे पाहून खूपच प्रभावित झाले. आम्ही मॉरिशसमध्ये केवळ 9 लोकांच्या टीमसह चित्रपटाची पाच गाणी शूट केली होती. त्या गाण्यांचा दर्जा तुम्ही पाहू शकता'. 

रवीना टंडनने हिंदी चित्रपटांचं मुंबई आणि परदेशात होणाऱ्या शुटिंगवर भाष्य केलं. ती म्हणाली, 'जेव्हा आम्ही शुटिंगसाठी स्वित्झर्लंड किंवा इतर ठिकाणी जायचो. तेव्हा आमच्यासोबत 200 लोकांटी टीम असायची. मी म्हणायचे की जेव्हा आपण 10 लोक मिळून हे सर्व काम करू शकतो तर मग इतक्या लोकांची काय गरज आहे?'

अभिनेत्रीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं तर, अलिकडेच रवीना टंडन ही कर्मा कॉलिग या सीरिजमध्ये दिसली होती. तर त्यापुर्वी ती 'KGF Chapter 2' मध्ये दिसली होती, ज्यामध्ये तिने यश आणि संजय दत्तसोबत काम केलं होतं. या फ्रँचायझीच्या तिसऱ्या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. आता रवीना टंडन 'वेलकम टू द जंगल'मध्ये दिसणार आहे. हा एक मल्टीस्टारर चित्रपट आहे, ज्यामध्ये अक्षय कुमार, सुनील शेट्टी, श्रेयस तळपदे, दिशा पटानी आणि इतर अनेक स्टार्स महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.
 

Web Title: Raveena Tandon reveals the big difference between the southern film industry and Bollywood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.