रवीना टंडनच्या क्यूट नातवाचा फोटो पाहिलात का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2020 19:00 IST2020-02-02T19:00:00+5:302020-02-02T19:00:02+5:30

रवीनानेच काही दिवसांपूर्वी तिच्या मुली आणि नातवासोबतचा फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे.

Raveena tandon grandson Rudra picture | रवीना टंडनच्या क्यूट नातवाचा फोटो पाहिलात का?

रवीना टंडनच्या क्यूट नातवाचा फोटो पाहिलात का?

ठळक मुद्देरवीनानेच काही दिवसांपूर्वी तिच्या मुली आणि नातवासोबतचा फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. तिचा नातू खूपच क्यूट असल्याचे तिचे चाहते कमेंटच्या माध्यमातून तिला सांगत आहेत.

बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडन काही महिन्यांपूर्वी आजी झाली आहे. रवीनाची मुलगी छाया हिने एका गोंडस बाळाला जन्म दिला. रवीनाने या नव्या सदस्याचे जोरदार स्वागत केले. या स्वागताचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. रवीनाने स्वत: सोशल मीडियावर ती आजी झाल्याची माहिती शेअर केली होती. परमेश्वराचे खूप खूप आभार, बाळ घरी आले आहे, असे तिने पोस्ट शेअर करताना लिहिले होते. आता तिच्या नातवाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

रवीनानेच काही दिवसांपूर्वी तिच्या मुली आणि नातवासोबतचा फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. तिचा नातू खूपच क्यूट असल्याचे तिचे चाहते कमेंटच्या माध्यमातून तिला सांगत आहेत. या पोस्टसोबत तिने लिहिले आहे की, काही दिवस खूपच खास असतात. आजचा माझा दिवस माझ्या कुटुंबियांसोबत... माझा छोट्याशा रुद्रसोबत आजचा दिवस आनंदात घालवला...

1995 मध्ये रवीनाने छायाला दत्तक घेतले होते. हीच छाया आता आई झाली आणि रवीना आजी. आजी झाल्याने रवीना गेल्या काही महिन्यांपासून जाम खूश आहे. रवीनाने 1995 मध्ये दोन मुली दत्तक घेतल्या होत्या. छाया आणि पूजा ही त्यांची नावे. त्यावेळी पूजाचे वय 11 वर्षं होते तर छाया आठ वर्षांची होती.

22 फेब्रुवारी 2004 रोजी रवीनाने फिल्म डिस्ट्रीब्युटर अनिल थडानीसेबत लग्न केले. या दोघांना 14 वर्षांची मुलगी राशा आणि 11 वर्षांचा मुलगा आहे. रवीनाने तिच्या अभिनयाने बॉलिवूडमध्ये एक काळ गाजवला आहे. तिने अनेक हिट चित्रपट दिले असून तिच्या अभिनयासाठी तिला अनेक पुरस्काराने देखील गौरवण्यात आले आहे. 

Web Title: Raveena tandon grandson Rudra picture

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.