"मी इतकंच सांगेन की...", विजय देवरकोंडासोबत लग्नाच्या चर्चांवर रश्मिका मंदानाने सोडलं मौन
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2025 10:44 IST2025-12-04T10:44:12+5:302025-12-04T10:44:47+5:30
विजय आणि रश्मिका फेब्रुवारी महिन्यात उदयपूर येथे लग्न करणार अशी काही दिवसांपासून चर्चा आहे.

"मी इतकंच सांगेन की...", विजय देवरकोंडासोबत लग्नाच्या चर्चांवर रश्मिका मंदानाने सोडलं मौन
रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा या क्युट कपलच्या लग्नाची अनेक दिवसांपासून चर्चा आहे. दोघांनी अद्याप एकमेकांवरील प्रेमाची कबुली दिलेली नाही. मात्र चाहत्यांनी अनेकदा त्यांना एकत्र पाहिलं आहे. कितीही लपवलं तरी त्यांचं प्रेम जगासमोर आलंच. दरम्यान विजय आणि रश्मिका फेब्रुवारी महिन्यात उदयपूर येथे लग्न करणार अशी काही दिवसांपासून चर्चा होती. त्या चर्चांवर रश्मिका मंदानाने उत्तर दिलं आहे.
विजय देवरकोंडासोबतच्या लग्नाच्या चर्चांवर रश्मिका मंदानाने मौन सोडलं आहे. द हॉलिवूड रिपोर्टर इंडियाला दिलेल्या मुलाखतीत रश्मिका मंदाना म्हणाली, "मी लग्नाच्या चर्चा स्वीकारतही नाही आणि यांचं खंडनही करु इच्छित नाही. मी फक्त इतकंच सांगेन की जेव्हा याबद्दल सांगायची वेळ येईल तेव्हा आम्ही सांगू."
रश्मिका आणि विजयचा साखरपुडा आधीच झाला आहे. दोघांनी अनेकदा बोटातील अंगठी फ्लॉन्ट केली आहे. सध्या दोघंही सिनेमांच्या शूटमध्ये व्यग्र आहेत. दरम्यान त्यांच्या टीमने फेब्रुवारीमध्ये दोघं लग्नबंधनात अडकणार हे कन्फर्म केलं आहे.
रश्मिका आणि विजय देवराकोंडा यांनी 'डिअर कॉम्रेड', 'गीता गोंविदम' या सिनेमांमध्ये एकत्र काम केलं आहे. 'गीता गोंविदम' सिनेमानंतरच रश्मिका नॅशनल क्रश म्हणून प्रसिद्ध झाली होती. सध्या ती हिंदी आणि दाक्षिणात्य दोन्ही सिनेसृष्टीत आघाडीवर आहे.