Rashmika Mandanna : रश्मिका मंदानाची तब्बल ८० लाखांची फसवणूक, जवळच्या व्यक्तीनेच गंडवलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2023 13:28 IST2023-06-19T13:27:06+5:302023-06-19T13:28:11+5:30
रश्मिकाच्या मागे लपूनछपून पैशांची चोरी

Rashmika Mandanna : रश्मिका मंदानाची तब्बल ८० लाखांची फसवणूक, जवळच्या व्यक्तीनेच गंडवलं
साऊथ अभिनेत्री रश्मिका मंदानाला (Rashmika Mandanna) तब्बल ८० लाखांचा गंडा बसला आहे. तिच्या मॅनेजरकडूनच तिची फसवणूक झाली आहे. माध्यम रिपोर्ट्सनुसार, ही गोष्ट निदर्शनास आल्यानंतर रश्मिकाने तिला नोकरीवर काढून टाकले आहे. अद्याप रश्मिकाने याबाबत कोणतंही अधिकृत स्पष्टीकरण दिलेलं नाही. मात्र जवळच्या व्यक्तीकडूनच फसवणूक झाल्याने रश्मिका चिंतेत आहे.
रिपोर्ट्सनुसार, मॅनेजर गेल्या अनेक दिवसांपासून रश्मिकाचं काम पाहत आहे. दरम्यान ती रश्मिकाच्या मागे लपूनछपून पैशांची चोरी करत होती. हे समजताच रश्मिकाला मोठा धक्का बसला आहे. मात्र तिला हे प्रकरण प्रकाशझोतात आणायचं नसल्याने ती शांत आहे.
रश्मिका लवकरच रणबीर कपूरच्या 'अॅनिमल' सिनेमात दिसणार आहे. सध्या 'अॅनिमल'चा फर्स्ट लुक रिलीज झाला आहे. यामुळे सिनेमाची उत्सुकता आणखी ताणली आहे. 11 ऑगस्ट रोजी सिनेमा प्रदर्शित होत आहे. याच दिवशी 'गदर 2', 'ओमजी 2' हे चित्रपटही प्रदर्शित होणार आहेत.