‘श्रीवल्ली’ झाली मुंबईकर; रश्मिका मंदानानं मुंबईत खरेदी केलं नवं घर!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2022 14:41 IST2022-02-03T14:41:07+5:302022-02-03T14:41:38+5:30
नॅशनल क्रश म्हणून ओळखली जाणारी रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) लवकरच बॉलिवूडमध्ये डेब्यू करतेय आणि आता तिने मुंबईत तिचं नवं घरही खरेदी केलं आहे.

‘श्रीवल्ली’ झाली मुंबईकर; रश्मिका मंदानानं मुंबईत खरेदी केलं नवं घर!
अल्लू अर्जुन ( Allu Arjun) आणि रश्मिका मंदानाच्या (Rashmika Mandanna) ‘पुष्पा’ने (Pushpa The Rise) धुमाकूळ घातला आहे आणि या चित्रपटानंतर अल्लू अर्जुन व रश्मिका दोघांचीही फॅन फॉलोइंग प्रचंड वाढली आहे. अल्लू अर्जुनने तर मेगास्टार रजनीकांत यांनाही मागे टाकलं आहे. रश्मिकाची फॅन फॉलोइंगही 28 मिलियनवर पोहोचली आहे. नॅशनल क्रश म्हणून ओळखली जाणारी रश्मिका लवकरच बॉलिवूडमध्ये डेब्यू करतेय आणि आता तिने मुंबईत तिचं नवं घरही खरेदी केलं आहे.
रश्मिकाने इन्स्टास्टोरीवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात तिने नवीन घरात शिफ्ट करत असल्याचं सांगितलं आहे. व्हिडीओ पॅकिंग बॉक्स दिसत आहे. तसं गेल्या वर्षी फेब्रुवारीतच रश्मिकाने मुंबईत नवं घर खरेदी केलं होतं. आता ती याच नवीन घरात शिफ्ट होतेय.
रश्मिकाही साऊथची मोठी अभिनेत्री आहे. साऊथ गाजवल्यानंतर ती बॉलिवूडही गाजवताना दिसणार आहे. ती लवकरच ‘मिशन मजनू’ आणि ‘गुडबाय’ या बॉलिवूडच्या चित्रपटांमध्ये झळकणार आहे. शूटींगच्या निमित्ताने रश्मिकाच्या मुंबईत मुक्कामाला असते. त्यामुळे तिने मुंबईत नवं घर खरेदी केलं असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.
‘पुष्पा’या चित्रपटातील अल्लू अर्जुन व रश्मिकाची केमिस्ट्री प्रेक्षकांना चांगलीच भावली आहे. या चित्रपटात रश्मिकाने श्रीवल्लीची भूमिका साकारली आहे. रश्मिका साऊथमधील सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. तिने ‘किरिक पार्टी’ या कन्नड चित्रपटातून कलाविश्वात पदार्पण केलं. त्यानंतर तिचे अनेक चित्रपट सुपरहिट ठरले. रिपोर्टनुसार, रश्मिका 30 कोटी रूपयांच्या संपत्तीची मालकीण आहे. बेंगळुरूमध्ये तिचा 8 कोटींचा व्हिला आहे. अलिशान गाड्या आहेत.