बादशहाच्या या वेडापायी गर्लफ्रेन्डने केले होते ब्रेकअप, रॅपरचा धक्कादायक खुलासा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2019 14:04 IST2019-11-29T14:04:10+5:302019-11-29T14:04:22+5:30
रॅपर आणि सिंगर बादशहाने कमी वेळात इंडस्ट्रीमध्ये आपल्या नावाचा दबदबा निर्माण केला. पण इथपर्यंतचा प्रवास नक्कीच सोपा नव्हता.

बादशहाच्या या वेडापायी गर्लफ्रेन्डने केले होते ब्रेकअप, रॅपरचा धक्कादायक खुलासा!
रॅपर आणि सिंगर बादशहाने कमी वेळात इंडस्ट्रीमध्ये आपल्या नावाचा दबदबा निर्माण केला. पण इथपर्यंतचा प्रवास नक्कीच सोपा नव्हता. एका ताज्या मुलाखतीत बादशहाने त्याच्या स्ट्रगलच्या दिवसांबद्दल सांगितले. रॅपर बनण्याच्या वेडापायी माझी गर्लफ्रेन्ड मला सोडून गेल्याचा खुलासाही त्याने केला.
‘पिंकविला‘ला दिलेल्या मुलाखतीत बादशहाने सांगितले की, स्ट्रगलच्या दिवसात खिशात पैसे नव्हते. अनेकदा जमीनीवर झोपून दिवस काढले. रॅपर बनण्याच्या वेडाने मला झपाटले होते. पण माझ्या कुटुंबाला माझा हा निर्णय मान्य नव्हता.
रॅपर बनण्याच्या नादात मी स्वत:चे वाटोळे करून घेईल, असे त्यांना वाटत होते. माझी गर्लफ्रेन्डही याच कारणाने मला सोडून गेली. रॅपरचे करिअर हे करिअर नाही, असे तिला वाटत होते. ती आयुष्यातून गेल्यावर मी कोलमडलो. पण हार मानली नाही. माझा संघर्ष मी सुरु ठेवला. जवळजवळ पाच वर्षे स्ट्रगल केल्यानंर माझ्या कुटुंबाला माझ्या कामाची कल्पना आली आणि त्यांनी मला पाठींबा दिला.
माझ्या आयुष्यातील प्रत्येक टप्पा मी एन्जॉय केला. मग ते पैशाविना प्रवास करणे असो वा जमिनीवर झोपणे असो. खरे तर हा काही खूप मोठा स्ट्रगल नव्हता. पण जे काही होते, त्याने मला संयम शिकवला, असेही बादशहाने सांगितले.
लवकरच अक्षय कुमार याचा आगामी सिनेमा ‘गुड न्यूज’मध्ये बादशहा गाताना दिसणार आहे.