Badshah : बादशाहच्या नवीन गाण्यात भोलेनाथचा उल्लेख, महाकालेश्वर मंदिराच्या पुजाऱ्यांनी घेतला आक्षेप

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2023 11:25 AM2023-04-20T11:25:21+5:302023-04-20T11:27:19+5:30

बादशाह विरोधात एफआयआर करण्याचा इशारा

rapper badshah new song album sanak lord shiva mentioned in song Mahakaleshwar temple priests objects | Badshah : बादशाहच्या नवीन गाण्यात भोलेनाथचा उल्लेख, महाकालेश्वर मंदिराच्या पुजाऱ्यांनी घेतला आक्षेप

Badshah : बादशाहच्या नवीन गाण्यात भोलेनाथचा उल्लेख, महाकालेश्वर मंदिराच्या पुजाऱ्यांनी घेतला आक्षेप

googlenewsNext

लोकप्रिय रॅपर बादशाह (Badshah) त्याच्या नवीन गाण्यामुळे अडचणीत सापडला आहे. त्याच्या नुकत्याच आलेल्या 'सनक' या अल्बम सॉंगमध्ये उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिराचा उल्लेख आहे. यावरुन महाकालेश्वर मंदिरातील ज्येष्ठ पुजाऱ्यांनी आक्षेप घेतला आहे. गाण्यातून महाकालेश्वरचे नाव काढण्यात यावं अशी मागणी त्यांनी केली आहे. तसंच बादशाह विरोधात एफआयआर करण्याचा इशाराही दिला आहे.

उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिराचे ज्येष्ठ पुजारी महेश पुजारी यांनी आरोप बादशाहविरोधात आरोप केला की, 'हिंदू सनातनात मिळत असलेल्या सूट चा दुरुपयोग होत आहे. साधूसंत,कथावाचक सर्वच यावर मौन धरुन आहेत. फिल्म स्टार असो किंवा गायक त्यांना देवाच्या नावाने अश्लीलता पसरवण्याचा अधिकारच नाही. देशभरात त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. असं तर कोणीही सनातन धर्माबद्दल चुकीची माहिती पसरवेल. आम्ही याचा विरोध करतो. महाकाल सेना आणइ पुजारी महासंघसहित हिंदू संघटन तात्काळ या गाण्यातून भोलेनाथचा उल्लेख हटवण्याची मागणी करत आहेत. 

बादशाहचे 'सनक' या २ मिनिट १५ सेकंदाचे गाणं सध्या ट्रेंडिंग आहे. या गाण्यात ४० सेकंदांनंतर कभी सेक्स कभी ज्ञान बाटता फिरु, असे बोल आहेत तर काही अश्लील शब्दप्रयोग आहेत. तीन तीन रात मे लगातार जागता, भोलेनाथ के साथ मेरी बनती है, अशा शब्दांचा वापर करण्यात आला आहे. युट्यूनवर 18 मिलियन लोकांनी गाणं पाहिलं आहे. सोशल मीडियावर गाण्याचे रील्सही ट्रेंडिंग आहेत. अनेकांना गाणं आवडलं आहे मात्र यामुळे शिवभक्त नाराज झाले आहेत.

Web Title: rapper badshah new song album sanak lord shiva mentioned in song Mahakaleshwar temple priests objects

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.