Rapper Badshah's Car Accident : बादशहाच्या गाडीला झाला अपघात, गाडीचा झालाय चक्काचूर
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2020 16:40 IST2020-02-04T16:37:23+5:302020-02-04T16:40:08+5:30
Rapper Badshah Car Accident : पंजाबमधील सरहिंदमधून दिल्लीकडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर हा अपघात झाला आहे.

Rapper Badshah's Car Accident : बादशहाच्या गाडीला झाला अपघात, गाडीचा झालाय चक्काचूर
प्रेक्षकांचा आवडता रॅपर बादशहाच्या गाडीचा नुकताच अपघात झाला असून तो थोडक्यात बचावला आहे. हा अपघात इतका भीषण होता की, त्याच्या गाडीचा चक्काचूर झाला आहे. केवळ अपघातादरम्यान गाडीतील एअर बॅग उघडल्यामुळे जीवितहानी टळली.
पंजाबमधील सरहिंदमधून दिल्लीकडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर हा अपघात झाला असून या महामार्गावर सध्या बांधकाम सुरू आहे. राजपुरा-सरहिंद बायपासजवळ बांधकाम सुरू असल्याने पुलावर सिमेंटच्या काही स्लॅब ठेवल्या होत्या. त्यातच अतिशय धुके असल्याने समोरचे काहीच दिसत नव्हते.
महामार्गावर बांधकाम सुरू असल्याचा कोणताही साईनबोर्ड देखील लावण्यात आला नव्हता. त्यामुळे अनेक गाड्या एकमेकांवर आदळल्या आणि हा अपघात झाला. हा अपघात गंभीर असला तरी बादशहाला जास्त दुखापत झालेली नाहीये. अपघात झाल्यानंतर बादशहा काहीच वेळात दुसऱ्या गाडीने चित्रीकरणासाठी रवाना देखील झाला.