रॅपर बादशाहने केली पीएम केअर फंडला इतक्या लाखांची मदत, सोशल मीडियावर म्हणाला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2020 15:56 IST2020-03-31T15:49:52+5:302020-03-31T15:56:41+5:30
बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रेटी मदत करण्यासाठी पुढे आले आहेत.

रॅपर बादशाहने केली पीएम केअर फंडला इतक्या लाखांची मदत, सोशल मीडियावर म्हणाला...
जगभरात कोरोना व्हायरसने थैमान मांडले आहे. त्यात देशातही कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत चालल आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 21 दिवसांसाठी लॉकडाउनची घोषणा केली. यासोबतच त्यांनी पीएम केअर फंडमध्ये डोनेशन देण्यासाठी लोकांना विनंती केली आहे. आतापर्यंत बॉलिवूडच्या अनेक कलाकरांनी मदतीचा हात पुढे करत पीएम केअर फंडला मदत केली आहे. बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रेटी मदत करण्यासाठी पुढे आले असून वरुण धवन, भुषण कुमार, राजकुमार राव, कपिल शर्मा, शिल्पा शेट्टी यांनी पंतप्रधान सहाय्यता निधीत काही लाखांची मदत केली आहे. अभिनेता अक्षय कुमारने तर 25 कोटींची मदत केली आहे.
रॅपर बादशाहने देखील 25 लाखांची मदत पीएम केअर फंडला केली आहे. बादशाह त्याच्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये लिहितो, आपला देश आणि संपूर्ण जग सध्या एका संकटात अडकले आहे. कोरोना व्हायरस विरुद्ध आपल्याला एक मोठी लढाई लढावी लागणार आहे. अशावेळी तुमची छोटीशी मदतसुद्धा देशासाठी महत्त्वाची असते. तुमच्याने जेवढी शक्य असेल तेवढी मदत करा. मीसुद्धा माझ्याकडून खारीचा वाटा उचलला आहे. सोशल मीडियावर बादशाहचे चाहते त्याचे कौतूक करतायेत.
सलमान खानची बिईंग ह्युमन ही संस्था आता चित्रपट इंडस्ट्रीशी निगडित असलेल्या २५ हजार लोकांची मदत करणार आहे. सलमान खानने २५ हजार कामगारांचे बँक डिटेल्स मागवले असून तो त्यांच्या खात्यात पैसे जमा करणार आहे.