राज कुंद्राच्या चाहत्यांकडून मिळाली बलात्कार, ठार मारण्याची धमकी; मॉडेलचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2021 10:29 IST2021-07-25T10:27:50+5:302021-07-25T10:29:26+5:30

ओशिवरा पोलिसांकडे तक्रार दाखल, सुमनची एक व्हिडीओ क्लिप व्हायरल झाली होती, ज्यात कुंद्राने तिला वेब सीरिजमध्ये काम मिळवून देण्यासाठी निर्वस्त्र होत ऑडिशन देण्याचा आरोप तिने केला होता.

Rape, death threats received from Raj Kundra fans; allegation by model Sagarika Shona | राज कुंद्राच्या चाहत्यांकडून मिळाली बलात्कार, ठार मारण्याची धमकी; मॉडेलचा आरोप

राज कुंद्राच्या चाहत्यांकडून मिळाली बलात्कार, ठार मारण्याची धमकी; मॉडेलचा आरोप

ठळक मुद्दे गेल्या तीन दिवसांपासून सुमनला सोशल मीडियावरून धमकीचे फोन येत आहेत. मला आणि माझ्या कुटुंबाच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. कुंद्रा प्रकरणी चौकशीत मी मुंबई पोलिसांना पूर्ण सहकार्य करण्यास तयार आहे.

मुंबई : ‘फेसबुक’ आणि ‘इन्स्टाग्राम’वरून मला अश्लील भाषेत शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी देण्यात येत आहे, असा आरोप मॉडेल सागरिका शोना सुमन हिने केला आहे. राज कुंद्राचे चाहते हा सगळा प्रकार करत असून त्यानुसार दखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात यावी, अशी विनंती तिने ओशिवरा पोलिसांना केली आहे. 

सुमनची एक व्हिडीओ क्लिप व्हायरल झाली होती, ज्यात कुंद्राने तिला वेब सीरिजमध्ये काम मिळवून देण्यासाठी निर्वस्त्र होत ऑडिशन देण्याचा आरोप तिने केला होता. गेल्या तीन दिवसांपासून सुमनला सोशल मीडियावरून धमकीचे फोन येत आहेत.  हे सगळे फोन राज कुंद्रा प्रकरणी येत असून त्यामुळे मला आणि माझ्या कुटुंबाच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे आता घाबरून मी माझे फेसबुक आणि ट्विटर खाते तात्पुरते बंद केले आहे. मात्र कुंद्रा प्रकरणी चौकशीत मी मुंबई पोलिसांना पूर्ण सहकार्य करण्यास तयार आहे. मात्र मला आणि माझ्या कुटुंबीयांना नुकसान पोहोचविण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना लवकरात लवकर अटक करावी, अशी तिची मागणी आहे.

उमेश कामत नामक व्यक्तीने ऑगस्ट, २०२० मध्ये सुमनला व्हिडीओ कॉल करत कुंद्राच्या वेब सीरिजमध्ये काम करण्यासाठी विचारणा केली. त्या वेळी तिला न्यूड ऑडिशन देण्यास सांगण्यात आले ज्याला तिने नकार दिला, असे सुमनचे म्हणणे आहे. त्यानुसार ओशिवरा पोलीस या प्रकरणी चौकशी करत आहेत. मुंबई पोलिसांनी अद्याप या प्रकरणी कुंद्रासह ११ लोकांना अटक केली आहे. ज्यात कुंद्रा आणि त्याच्या एका साथीदाराला २७ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

Web Title: Rape, death threats received from Raj Kundra fans; allegation by model Sagarika Shona