अक्षय सोबत काम करण्यास रणवीरचा नकार
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2016 16:11 IST2016-06-15T10:41:21+5:302016-06-15T16:11:21+5:30
रणवीर सध्या बाजीराव मस्तानी चित्रपटाच्या यशाची फळे चाखत असून यशोशिखर गाठणाऱ्या रणवीरला करण जोहरने एका चित्रपटात काम करण्यासाठी विचारणा ...

अक्षय सोबत काम करण्यास रणवीरचा नकार
र वीर सध्या बाजीराव मस्तानी चित्रपटाच्या यशाची फळे चाखत असून यशोशिखर गाठणाऱ्या रणवीरला करण जोहरने एका चित्रपटात काम करण्यासाठी विचारणा केली. मात्र करणच्या त्या सिनेमात अगोदरच अक्षयला एका भूमिकेसाठी घेतले असून दुसऱ्या भूमिकेसाठी रणवीरने स्पष्ट नकार दिला.
ज्या सिनेमात अक्षय कुमारसारखा अभिनेता आधीपासूनच आहे, त्यात भूमिका करुन आपली वेगळी छाप पाडता येणार नाही, हे रणवीरला समजले असून त्यामुळे त्याने एकाच सिनेमात सहअभिनेता बनण्यास थेट नकार कळवला आहे, अशी सध्या चर्चा आहे.
स्वत:ची वेगळी छाप पाडण्यासाठी रणवीर सध्या सोलो हिरो चित्रपटांकडे लक्ष देत असल्याचे समजते. याच कारणाने अक्षय सोबत काम करण्यास नकार दिल्याचे बोलले जात आहे.