रणवीरच्या नव्या घरी ‘सीक्रेट सेरेमनी’
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2016 16:32 IST2016-07-20T10:59:56+5:302016-07-20T16:32:42+5:30
‘ बेफिक्रे’ अॅक्टर रणवीर सिंह सध्या वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत आहे. रणवीरने त्याची गर्लफे्रन्ड दीपिका पदुकोण हिच्याशी गुपचूप साखडपुडा अर्थात रोका ...

रणवीरच्या नव्या घरी ‘सीक्रेट सेरेमनी’
‘ बेफिक्रे’ अॅक्टर रणवीर सिंह सध्या वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत आहे. रणवीरने त्याची गर्लफे्रन्ड दीपिका पदुकोण हिच्याशी गुपचूप साखडपुडा अर्थात रोका उरकल्याची चर्चा सध्या जोरात आहे. अर्थात या बातमीला रणवीर वा दीपिका या दोघांपैकी अद्याप कुणीही दुजोरा दिलेला नाही. मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,काही दिवसांपूर्वी रणवीरच्या मुंबईमधील नव्या घरात एक ‘सीक्रेट सेरेमनी’ पार पडली. मात्र ही ‘सीक्रेट सेरेमनी’ म्हणजे रणवीर-दीपिकाचा रोका होती की निव्वळ गृहप्रवेशाची पूजा, हे कळायला मार्ग नाही. या ‘सीक्रेट सेरेमनी’ सेरेमनीला रणवीरचे अतिशय जवळचे कुटुंबीयच तेवढे हजर होते. आता या जवळच्या कुटुंबीयांनी रणवीर-दीपिकाला आशीर्वाद दिला की केवळ रणवीरला गृहप्रवेशाच्या शुभेच्छा दिल्या, ते कळेलच...तोपर्यंत वेट अॅण्ड वॉच!!