शत्रूघ्न सिन्हांच्या बायोपिकसाठी रणवीरच परफेक्ट!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2016 16:26 IST2016-09-21T10:42:58+5:302016-09-21T16:26:21+5:30
बॉलिवूडचे ‘शॉटगन’ शत्रूघ्न सिन्हा यांच्यावर आयुष्यावर बेतलेला सिनेमा अर्थात बायोपिक काढायचा झाल्यास यात शत्रूघ्न यांची भूमिका कोण वठवणार? तुमच्या ...

शत्रूघ्न सिन्हांच्या बायोपिकसाठी रणवीरच परफेक्ट!
>बॉलिवूडचे ‘शॉटगन’ शत्रूघ्न सिन्हा यांच्यावर आयुष्यावर बेतलेला सिनेमा अर्थात बायोपिक काढायचा झाल्यास यात शत्रूघ्न यांची भूमिका कोण वठवणार? तुमच्या डोक्यात वेगवेगळ्या अभिनेत्यांची नावे येऊ शकतील. शत्रूघ्न सिन्हा यांची लाडकी लेक सोनाक्षी सिन्हा अर्थात सोनाला आम्ही हाच प्रश्न केला. यावर क्षणाचाही विलंब न लावता, सोनाने नाव घेतले ते रणवीर सिंह याचे. होय, सोनाचा ‘लुटेरा’मधील को-स्टार रणवीर सिंह. रणवीर हाच माझ्या वडिलांच्या भूमिकेला न्याय देऊ शकेल, असा सोनाचा पक्का विश्वास आहे. खुद्द शत्रूघ्न यांनी सुद्धा स्वत:च्या बायोपिकमध्ये त्यांच्या भूमिकेसाठी रणवीरच परफेक्ट असल्याचे म्हटले होते. सोना वडिलांच्या या मताशी सहमत दिसली. माझ्या वडिलांची एनर्जी आणि त्यांचे एकूणच व्यक्तीमत्त्व बघता, त्यांची भूमिका रणवीर अगदी परफेक्ट वठवू शकेल. मी ‘लुटेरा’मध्ये त्याच्यासोबत काम केले आहे. त्यामुळेच त्याच्याबद्दल मी ठामपणे असे बोलू शकते, असेही सोना म्हणाली. आता शत्रूघ्न व सोना यांची पसंती तर आपल्याला कळली. म्हणजे आता प्रतीक्षा ती केवळ शत्रूघ्न यांच्यावरील बायोपिकची!!
![]()