काय रे तुझी ही हेअरस्टाईल, रणवीर सिंहवर भन्नाट मिम्स आणि विनोद जबरदस्त ट्रेंडिंग, एकदा पाहाच
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2021 14:46 IST2021-09-10T14:45:41+5:302021-09-10T14:46:08+5:30
रणवीर सिंहच्या हटके हेअर स्टाईलनेच सर्वांचे लक्ष वेधून घेतले. रणवीरचा अतरंगी लूक पाहून युजर्सही त्याची खिल्ली उडवत असल्याचे पाहायला मिळत आहे.

काय रे तुझी ही हेअरस्टाईल, रणवीर सिंहवर भन्नाट मिम्स आणि विनोद जबरदस्त ट्रेंडिंग, एकदा पाहाच
बऱ्याचदा रणवीरची हटके फॅशन आणि स्टाइल चर्चेचा विषय बनते. अनेकदा त्याच्या कपड्यांवरून त्याची खिल्लीही उडवली जाते. मात्र रणवीरला या गोष्टीचा काहीही फरक पडत नाही. त्याला जे आवडतं ते तो परिधान करतो. तशी स्टाईल करतो. त्याच्या हटके आणि अतरंगी स्टाईलमुळे तो नेहमीच सर्वांचे आकर्षण ठरतो पुन्हा एकदा रणवीर याच कारणामुळे सर्वांचे आकर्षण ठरला आहे. नुकताच त्याचा नवीन लूक समोर आला. यावेळी त्याच्या हेअर स्टाईलनेच सर्वांचे लक्ष वेधून घेतले. रणवीरचा अतरंगी लूक पाहून युजर्सही त्याची खिल्ली उडवत असल्याचे पाहायला मिळत आहे.
Wifi #RanveerSinghpic.twitter.com/e9Xf9k45by
— ANMOL KAUR (@anmol_banga) September 8, 2021
रणवीरने एक नाही तर चक्क दोन पोनी बांधल्या आहेत. रणवीरच्या या अतरंगी हेअरस्टाईमुळे युजर्सने त्याच्यावर भन्नाट विनोदी मिम्स बनवले आहे. जितका त्याचा हा लूक व्हायरल झाला आहे. तितकेच सोशल मीडियावर त्याच्यावर बनवलेले मिम्सही जबरदस्त ट्रेंडमध्ये आहेत. सोशल मीडियावर सध्या रणवीर सिंहवर बनवलेले मिम्सना प्रचंड पसंती मिळत आहेत. वाचून नेटीझन्सही लोटपोट होत आहेत.
इतकेच काय तर भन्नाट कमेंट करत असल्याचे पाहायला मिळत आहे. डोक्यावर नारळाच झाड उगवलं की का? विचारही करु शकणार नाही. नेटीझन्सने इतक्या विविध प्रकारच्या कमेंट्स तुम्हाला रणवीरच्या फोटोवर वाचायला मिळतील. त्याच्या फोटोपेक्षी तर मिम्सच जास्त सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
जेव्हा भर मैफिलित, गप्प जागेवर बस म्हणून होस्टनेच रणवीरला झापले, काय होतं कारण
रणवीर कधी त्याच्या अतरंगी फॅशन स्टाईलमुळे तो चर्चेत असतो तर कधी त्याचे वागणं जरा विचित्र असले तरी दिलखुलास असते. त्याचा अतिउत्साह हा प्रत्येक बाबतीत दिसून येतो.एकदा त्याचा हाच अतिउत्साह एकदा त्याला चांगलाच नडला होता.अभिनेत्री इरा दुबेनेही रणवीरचे वागणे बघून त्याला सुनावले होते. खुद्द इरानेच या गोष्टीचा खुलासा एका मुलाखतीत केला होता.एका पुरस्कार सोहळ्यात हा किस्सा घडला होता. कार्यक्रमात उपस्थित सगळेच अतिशय शांततेत कार्यक्रमाचा आनंद लुटत होते. रणवीर मात्र वेगळ्याच धुंदीत होता. इकडून -तिकडे गोंधळ घालत होता. रणवीरचे असे वागणे पाहून इराची मात्र सटकली आणि सगळ्यांसमोर तिने गप्प एका जागी जागेवर बस म्हणून त्याला खडसावले होते.