'धुरंधर' सिनेमातील रणवीर सिंगचे फोटो झाले लीक, दिसला चार वेगळ्या लूक्समध्ये
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2025 15:40 IST2025-05-19T15:40:09+5:302025-05-19T15:40:33+5:30
अभिनेता रणवीर सिंग (Ranveer Singh) लवकरच 'धुरंधर' सिनेमात दिसणार आहे. या चित्रपटामुळे तो चर्चेत आला आहे.

'धुरंधर' सिनेमातील रणवीर सिंगचे फोटो झाले लीक, दिसला चार वेगळ्या लूक्समध्ये
अभिनेता रणवीर सिंग (Ranveer Singh) बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता आहे. तो प्रत्येक भूमिका उत्तमरित्या रुपेरी पडद्यावर साकारतो. मग त्याने साकारलेला बाजीराव असो किंवा सिंबा.. विविध भूमिका साकारुन रसिकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. आता लवकरच तो धुरंधर सिनेमात दिसणार आहे. या चित्रपटामुळे तो चर्चेत आला आहे. सध्या या चित्रपटाचे शूटिंग सुरू असून सेटवरील फोटो लीक झाले आहेत. यात तो चार वेगवेगळ्या लूक्समध्ये दिसतो आहे. या लूक्सनी चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढवली आहे.
आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर' हा सिनेमा आधीपासूनच चर्चेचा विषय बनला असून, रणवीरच्या या जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशननं त्याला एका नव्या उंचीवर नेलं आहे. रणवीर एका लूकमध्ये रायफल हातात घेतलेला दिसतो, चेहऱ्यावर तीव्रता आणि डोळ्यांत रौद्र भाव. केस अर्ध्या अंबाड्यात बांधलेले, सोबत कुर्ता-पायजमा असा रॉ आणि रग्ड स्टाईलचा अंदाज. हा लूक सिनेमाच्या अॅक्शन-पॅक्ड आणि ग्रिट्टी टोनचा स्पष्ट संकेत देतो.
दुसऱ्या लूकमध्ये रणवीर ब्लॅक पठाणी सूटमध्ये झळकतो. एकदम स्टायलिश आणि पॉवरफुल. केस अर्धवट अंबाड्यात बांधलेले असून, काही केस मोकळे सोडले आहेत आणि दाढी घनदाट आहे. त्याचा हा लूक करिष्मा आणि उर्जा यांचा उत्तम संगम दाखवतो. एका फोटोत रणवीर ब्राउन पँटसूटमध्ये असून, डोक्यावर गुलाबी पगडी आहे. त्याच्या चेहऱ्यावर घनदाट दाढी आणि शरीरावर बळकटपणा स्पष्ट जाणवतो. त्याचा हा लूक कमांडिंग आणि इन्टेन्स आहे. प्रेक्षकांमध्ये आदर आणि उत्सुकता निर्माण करणारा. एका व्हिडीओ क्लिपमध्ये रणवीर लांब, विस्कटलेले केस, जाड दाढी, आणि पठाणी कुर्ता-पायजमा परिधान करून दिसतो. हातात सिगरेट आणि डोळ्यांत जबरदस्त तीव्रता यामुळे त्याचा हा लूक अलाउद्दीन खिलजीच्या आठवणी जागवतो. धुरंधर हा चित्रपट केवळ रणवीरच्या अभिनयामुळे नव्हे, तर त्याच्या अंगभूत रूपांतर क्षमतेमुळेही चर्चेचा विषय ठरत आहे. विविध रूपांत प्रेक्षकांसमोर येणाऱ्या रणवीरकडून काय धडाकेबाज परफॉर्मन्स मिळणार आहे, हे पाहणं नक्कीच रोचक ठरणार आहे.