रणवीर सिंगच्या 'धुरंधर'चा दमदार टायटल ट्रॅक रिलीज; ट्रेलर 'या' तारखेला येणार भेटीला
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2025 19:53 IST2025-10-16T19:52:35+5:302025-10-16T19:53:15+5:30
Ranveer Singh's 'Dhurandhar' Movie : रणवीर सिंगचा आगामी चित्रपट 'धुरंधर' हा या वर्षातील सर्वाधिक चर्चेत असलेल्या चित्रपटांपैकी एक आहे.

रणवीर सिंगच्या 'धुरंधर'चा दमदार टायटल ट्रॅक रिलीज; ट्रेलर 'या' तारखेला येणार भेटीला
रणवीर सिंगचा आगामी चित्रपट 'धुरंधर' हा या वर्षातील सर्वाधिक चर्चेत असलेल्या चित्रपटांपैकी एक आहे. 'उरी: द सर्जिकल स्ट्राइक' नंतर चित्रपट निर्माता आदित्य धर या 'रॉ अॅक्शन थ्रिलर'सह पुनरागमन करत आहेत. या चित्रपटाला घेऊन चाहत्यांमध्ये जबरदस्त उत्सुकता आहे. अशातच, निर्मात्यांनी आज 'धुरंधर'चा दमदार टायटल ट्रॅक रिलीज केलं आहे आणि त्याचबरोबर ट्रेलर रिलीजची तारीखही जाहीर केली आहे.
'धुरंधर'चा टीझर रिलीज झाल्यापासूनच या बहुप्रतीक्षित चित्रपटाबद्दल चर्चा सुरू झाली आहे. या चित्रपटातील रणवीर सिंगच्या दमदार लूकने लोकांच्या अंगावर रोमांच उभे केले होते. आता निर्मात्यांनी या चित्रपटाचा टायटल ट्रॅक रिलीज केला आहे. हे गाणे १९९५ च्या मूळ पंजाबी गाणे 'ना दिल दे परदेसी नू (जोगी)' चे आधुनिक रूप आहे. मूळ गाणे मोहम्मद सादिक आणि रणजीत कौर यांनी गायले होते.
नवीन व्हर्जनला हनुमानकाइंड, जॅस्मीन सँडलस, सुधीर यदुवंशी आणि शाश्वत सचदेव यांनी आवाज दिला आहे, तर शाश्वत सचदेव आणि चरणजीत आहुजा यांनी याला संगीत दिले आहे. बाबू सिंग मान यांनी याचे बोल लिहिले आहेत. सचदेव यांनी या ट्रॅकला सिनेमाचा आत्मा म्हटले आहे आणि सांगितले की हे सुरुवातीपासूनच पटकथेत विणले गेले होते.
'धुरंधर'चा ट्रेलर कधी येणार?
'धुरंधर'चा टायटल ट्रॅक रिलीज करण्यासोबतच निर्मात्यांनी याच्या ट्रेलर रिलीजची तारीखही जाहीर केली आहे. गाण्याच्या शेवटी ही गोष्ट उघड झाली आहे की, रणवीर सिंग अभिनीत या चित्रपटाचा ट्रेलर १२ नोव्हेंबर रोजी रिलीज होईल. त्यामुळे आता चाहते ट्रेलरसाठी उत्सुक आहेत.
'धुरंधर' कधी रिलीज होईल?
रणवीर सिंग स्टारर या चित्रपटात संजय दत्त, अक्षय खन्ना, आर. माधवन आणि अर्जुन रामपाल यांनीही महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. आदित्य धर लिखित, दिग्दर्शित आणि निर्मित असलेला आणि ज्योती देशपांडे व लोकेश धर यांनी संयुक्तपणे निर्मित केलेला 'धुरंधर' मोठ्या पडद्यावर एक भव्य सिनेमॅटिक अनुभव देण्याचे वचन देतो. हा चित्रपट ५ डिसेंबर रोजी सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होत आहे.