दीपिका पादुकोणच्या पप्पांशी वाढतेयं रणवीर सिंगची सलगी? पण कशासाठी?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2017 13:37 IST2017-12-18T08:07:08+5:302017-12-18T13:37:08+5:30
अनुष्का शर्मा व विराट कोहलीच्या लग्नानंतर एका बॉलिवूडच्या एका लव्हबर्ड्सच्या लग्नाकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. होय, हे लव्हबर्ड्स कोण ...
.jpg)
दीपिका पादुकोणच्या पप्पांशी वाढतेयं रणवीर सिंगची सलगी? पण कशासाठी?
अ ुष्का शर्मा व विराट कोहलीच्या लग्नानंतर एका बॉलिवूडच्या एका लव्हबर्ड्सच्या लग्नाकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. होय, हे लव्हबर्ड्स कोण तर दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग. रणवीर व दीपिकाचे प्रेम कुणापासूनही लपलेले नाही. नाही म्हणायला, मध्यंतरी या कपलचे ब्रेकअप झाल्याची खबर आली होती. ब्रेकअपच्या या बातमीने चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. पण कालांतराने ही बातमी अफवा निघाली. कारण त्यानंतर दीपिका व रणवीर यांची जवळीक अधिकच वाढताना दिसली. आता तर केवळ रणवीर व दीपिकाच नाही तर त्यांचे कुटुंबीयही जवळ येत असल्याचे दिसते आहे. खरे वाटत नसेल तर रणवीरचे सोशल अकाऊंट तुम्हाला तपासायला हवे. होय, आपल्या सोशल अकाऊंटवर रणवीरने शेअर केलेला एक सेल्फी सध्या सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. याचे कारण हा सेल्फी बराच खास आहे. होय, यात रणवीर दीपिकाचे पप्पा प्रकाश पादुकोण यांच्यासोबत दिसतोय.
![]()
ALSO READ : OMG!! रणवीर सिंगचे ‘रॅप’ तुम्ही पाहिलेत? मुंबईकरांसोबत रंगली जुगलबंदी!
अलीकडे प्रकाश पादुकोण यांच्या ‘पादुकोण-द्रविड सेंटर फॉर स्पोर्ट्स एक्सलन्स’ या नव्या इन्स्टिट्यूटचे उद्घाटन झाले. या सोहळ्याला रणवीर खास निमंत्रित होता. या इव्हेंटरमध्ये रणवीरने दीपिकाच्या पप्पांसोबत सेल्फी घेतली. दुसºया शब्दांत सांगायचे तर आपल्या ‘होणा-या सासरेबुवा’सोबत सेल्फी घेतला. यात रणवीर व प्रकाश पादुकोण दोघेही प्रचंड आनंदी दिसताहेत.
काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत प्रकाश पादुकोण दीपिका व रणवीरच्या नात्यावर बोलले होते. रणवीर व दीपिका दोघेही समजदार आहेत. आपण काय करतोय, याचे भान त्यांना आहे. एक पिता या नात्याने मी दीपिकाला नेहमीच तिचे निर्णय तिने घेण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. रणवीरही त्याचा निर्णय घ्यायला स्वतंत्र आहे, असे प्रकाश पादुकोण म्हणाले होते.