रणवीर सिंहच्या मदतीला धावून आले संजय लीला भन्साळी, बिग बजेट सिनेमाची दिली ऑफर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2023 02:03 PM2023-04-17T14:03:35+5:302023-04-17T14:04:19+5:30

फ्लॉप सिनेमांनंतर रणवीर सिंहला संजय लीला भन्साळींची साथ

Ranveer Singh will be seen in sanjay leela bhansali next film baiju bawra | रणवीर सिंहच्या मदतीला धावून आले संजय लीला भन्साळी, बिग बजेट सिनेमाची दिली ऑफर

रणवीर सिंहच्या मदतीला धावून आले संजय लीला भन्साळी, बिग बजेट सिनेमाची दिली ऑफर

googlenewsNext

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह (Ranveer Singh) सध्या गायबच आहे. त्याचा शेवटचा चित्रपट 'सर्कस' चांगलाच आपटला. रोहित शेट्टीचा हा सिनेमा असूनही बॉक्सऑफिसवर कमाल दाखवू शकला नाही. आता तर रणवीर सिंह आणखी अडचणीत सापडला आहे. यशराज फिल्म्सने (YRF) रणवीरला सध्या साईन करुन घेण्यास नकार दिला आहे. या कठीण परिस्थितीत आता संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) रणवीर सिंहच्या मदतीला धावून आले आहेत.

माध्यम रिपोर्ट्सनुसार, रणवीर सिंह लवकरच संजय लीला भन्साळी यांच्या 'बैजू बावरा' या सिनेमात दिसणार आहे. याआधी भन्साळी प्रोडक्शनखाली त्याने 'बाजीराव मस्तानी' आणि 'पद्मावत' या सिनेमात काम केले होते. हे दोन्ही सिनेमे तुफान हिट झाले. भन्साळी आणि रणवीर सिंह जेव्हा एकत्र येतात तेव्हा पडद्यावर जादू घडतेच. त्यामुळे आता 'बैजू बावरा' सिनेमाची चाहत्यांना प्रतिक्षा असणार आहे.

Salman Khan -Aishwarya Rai : सलमानसोबतच्या ब्रेकअपबद्दल ऐश्वर्या रायचं मौन का? म्हणाली, "माझं कुटुंब मला..."

तर दुसरीकडे आदित्य चोप्राच्या निकटवर्तियाने सांगितले,'कोण म्हणालं यशराज फिल्म्स रणवीर सिंहसोबत काम करणार नाही. आदित्य चोप्राचा रणवीर आवडीचा कलाकार आहे. आणि रणवीर संजय लीला भन्साळींच्या सिनेमातून जोरदार कमबॅक करेल. ही एक आयकॉनिक फिल्म ठरेल. आदित्यने सिनेमातून रणवीर सिंहला काढा असं सुचवलं हे साफ खोटं आहे. भन्साळींच्या या सिनेमात रणवीर सिंह आणि आलिया भट सोबत काम करतील.

DDLJ सिनेमातील 'या' भूमिकेसाठी मिलिंद गुणाजीने दिला होता नकार, काय होतं कारण?

रणवीरच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर तो लवकरच करण जोहरच्या 'रॉकी और रानी की प्रेमकहानी' या सिनेमात आलिया भटसोबत झळकणार आहे. बऱ्याच काळानंतर करण जोहरने स्वत: सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. यामध्ये जया बच्चन आणि धर्मेंद्र यांची सुद्धा भूमिका असणार आहे.

Web Title: Ranveer Singh will be seen in sanjay leela bhansali next film baiju bawra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.