'सिंग इज किंग'च्या सीक्वलमध्ये काम करण्यास रणवीर सिंगने दिला नकार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2018 12:17 IST2018-01-08T06:47:08+5:302018-01-08T12:17:08+5:30

तुम्हाला काही दिवसांपूर्वी आम्ही सांगितले होते की रणवीर सिंग अक्षय कुमारच्या सुपरहिट चित्रपट सिंग इज किंगच्या सीक्वलमध्ये दिसणार आहे. ...

Ranveer Singh refuses to work in 'Sing Is King' sequel? | 'सिंग इज किंग'च्या सीक्वलमध्ये काम करण्यास रणवीर सिंगने दिला नकार?

'सिंग इज किंग'च्या सीक्वलमध्ये काम करण्यास रणवीर सिंगने दिला नकार?

म्हाला काही दिवसांपूर्वी आम्ही सांगितले होते की रणवीर सिंग अक्षय कुमारच्या सुपरहिट चित्रपट सिंग इज किंगच्या सीक्वलमध्ये दिसणार आहे. या गोष्टीमुळे रणवीर सिंगचे फॅन्स खूपच खूष झाले होते. या चित्रपटास होकर देण्याआधी त्यांने अक्षय कुमारकडून परवानगी देखील मागितली होती. मात्र नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार हा चित्रपट करण्यास रणवीर सिंगने नकार दिल्याचे समजते आहे. 

तुम्हाला वाटले असेल कदाचित अक्षय कुमारसोबत असलेल्या त्याच्या मैत्रिच्या संबंधामुळे त्यांने चित्रपट करण्यास नकार दिला आहे तर तसे अजिबात नाही आहे. मिड डे-च्या रिपोर्टनुसार या मागचे कारण काही वेगळे आहे. रणवीरने मनीषला प्रोमिस केले होते की सरदारची भूमिका सगळ्यात आधी मी तुझ्याच चित्रपटात करेन.

सूत्रांच्या माहितीनुसार रणवीर सिंगने चित्रपटाचा निर्माता शैलेंद्र सिंगशी स्क्रिप्ट संदर्भात मिटिंग केली होती.  रणवीर सिंगला चित्रपटाची कथा प्रचंड आवडली होती. त्यानंतर रणवीर सिंगच्या मॅनेजरने निर्मात्याला फोन करून रणवीर हा चित्रपट करणार नसल्याचे सांगितल त्यावेळी शैलेंद्र ही हे ऐकून हैराण झाला. त्यानंतर निर्मात्यांने चित्रपटाच्या कास्टिंगसाठी इतर कलाकारांशी भेटीगाठी सुरु केल्या आहेत.  

अक्षय कुमारचा सिंग इज किंग चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला होता. ज्यानंतर फॅन्स या चित्रपटाच्या सीक्वलची वाट पाहत होते. आता रणवीर सिंगने हा चित्रपट नकारल्यानंतर आता ही भूमिका कोण साकारणार हे जाणून घेण्यासाठी आपल्याला थोडी वाट बघावी लागणार आहे. 

ALSO READ :  ‘पद्मावती’ क्लॅशवर अक्षयकुमारने थोपटले दंड; म्हटले ‘पॅडमॅन’ ठरलेल्या तारखेलाच रिलीज होईल!


गेल्या अनेक दिवसांपासून वादात अडकलेले रणवीरचा पद्मावत चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.‘पद्मावत’मध्ये रणवीर अलाऊद्दीन खिल्जीच्या निगेटीव्ह रोलमध्ये दिसणार आहे.. रणवीरच्या भूमिकेला निगेटीव्ह शेड्स आहे. दीपिका पादुकोण यात राणीच्या  भूमिका साकारतो आहे तर शाहिद कपूर राजा महारावल रतन सिंहच्या भूमिकेत दिसणार आहे. अक्षय कुमारच्या पॅडमॅनसोबतचा 25 जानेवारी हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर रिलीज होणार आहेत. यानंतर रणवीर १९८३च्या विश्वकप विजेत्या भारतीय संघावर आधारित चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन कबीर खान करतो आहे. रणवीर सिंग यात त्यावेळीचे भारतीय संघाचे कर्णधार कपिल देव यांची भूमिका साकारतो आहे

Web Title: Ranveer Singh refuses to work in 'Sing Is King' sequel?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.