'धुरंधर'च्या यशानंतरही रणवीर सिंह गायब? आता दिली पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, 'पाजी खूप...'
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2026 10:54 IST2026-01-01T10:54:09+5:302026-01-01T10:54:39+5:30
सिनेमाच्या यशावर रणवीर सिंहची एकाच वाक्यात प्रतिक्रिया

'धुरंधर'च्या यशानंतरही रणवीर सिंह गायब? आता दिली पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, 'पाजी खूप...'
२०२५ वर्ष संपलं पण 'धुरंधर'ची जादू अजूनही कायम आहे. 5 डिसेंबर रोजी रिलीज झालेल्या या सिनेमाने अक्षरश: धुरंधर कमाई केली आहे. आदित्य धर दिग्दर्शित सिनेमात रणवीर सिंह, आर माधवन, अर्जुन रामपाल, संजय दत्त आणि अक्षय खन्ना अशी तगडी स्टारकास्ट आहे. 'धुरंधर'च्या दुसऱ्या पार्टची सर्वांनाच उत्सुकता आहे जो यावर्षी मार्चमध्ये रिलीज होणार आहे. सिनेमाच्या तुफान यशानंतर अक्षय खन्ना नेहमीप्रमाणे गायब आहे. मात्र रणवीर सिंहनेही आतापर्यंत कुठेही प्रतिक्रिया दिलेली नव्हती. तो पत्नी दीपिकासोबत न्यूयॉर्कमध्ये आनंद घेत आहे. दरम्यान आता सिनेमाच्या यशावर रणवीरची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
'धुरंधर'मध्ये रणवीर सिंहने हमजा अलीची भूमिका साकारली आहे. सिनेमाच्या यशानंतर रणवीरने एकही मुलाखत दिलेली नाही ना कोणती पोस्ट केली आहे. त्याने सध्या लो प्रोफाईल मेन्टेन केलं आहे. पापाराझी, स्पॉटलाईटपासूनही तो दूरच आहे. नेहमी हाय एनर्जीमध्ये दिसणाऱ्या रणवीरची शांतता चाहत्यांना खटकत आहे. दरम्यान सेलिब्रिटी फोटोग्राफर वरिंदर चावलाशी रणवीरचं बोलणं झालं. हिंदी रशला दिलेल्या मुलाखतीत वरिंदर चावलाने सांगितलं की 'धुरंधर'साठी आपण खूप मेहनत घेतल्याचं रणवीर म्हणाला होता. वरिंदर चावला म्हणाले,"प्रमोशनवेळी मी रणवीरला दोन वेळा भेटलो. तो फक्त एकच वाक्य म्हणाला, 'पाजी खरंच सांगतोय यासाठी खूप मेहनत घेतली आहे.'.
ते पुढे म्हणाले, "रणवीरने सिनेमासाटी १५ किलो वजन वाढवलं. मी जेव्हा धुरंधर बघून बाहेर आलो तेव्हा मलाही रणवीरच्या मेहनतीची जाणीव झाली. मी रणवीरला लगेच मेसेज केला की मला सिनेमा खूप आवडला. तेव्हा रणवीरने यावर 'खूप मेहनत घेतलीये' असाच रिप्लाय दिला. मी म्हणालो, 'मला तुला मिठी मारायची आहे. कोणी इतका प्रयत्न करतो, मेहनत करतो अशात अनेक लोक त्या व्यक्तीविरोधात वैर काढण्यासाठी काहीतरी वाईट साइट बोलत. हे चुकीचं आहे."
'धुरंधर'ने जगभरात ११०० कोटी पार कमाई केली आहे. सिनेमाचा दुसरा पार्ट १९ मार्च रोजी रिलीज होणार आहे. हा पहिल्या पार्टपेक्षाही जास्त खतरनाक असेल अशी प्रतिक्रिया सिनेमातील काही कलाकारांनी दिली आहे.