'धुरंधर: द रिव्हेंज'नंतर 'या' चित्रपटात दिसणार रणवीर, प्रसिद्ध दिग्दर्शकाच्या मुलीसोबत जमणार जोडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2026 18:03 IST2026-04-05T18:02:36+5:302026-04-05T18:03:15+5:30

 'धुरंधर' आणि 'धुरंधर: द रिव्हेंज'नंतर आता रणवीरच्या आगामी सिनेमाबद्दल चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

Ranveer Singh Pralay Movie Zombie Thriller Hansal Mehta Kalyani Priyadarshan | 'धुरंधर: द रिव्हेंज'नंतर 'या' चित्रपटात दिसणार रणवीर, प्रसिद्ध दिग्दर्शकाच्या मुलीसोबत जमणार जोडी

'धुरंधर: द रिव्हेंज'नंतर 'या' चित्रपटात दिसणार रणवीर, प्रसिद्ध दिग्दर्शकाच्या मुलीसोबत जमणार जोडी

सध्या सगळीकडे अभिनेता रणवीर सिंह याचीच चर्चा सुरू आहे. 'धुरंधर' आणि 'धुरंधर: द रिव्हेंज'मुळे रणवीरचं तर नशीबच पालटलं आहे. त्याला बॉक्स ऑफिसचा 'बब्बर शेर' अशी उपमा चाहत्यांनी दिली आहे.  'धुरंधर' आणि 'धुरंधर: द रिव्हेंज'नंतर आता रणवीरच्या आगामी सिनेमाबद्दल चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. रणवीर आता निर्माते हंसल मेहता यांच्या 'प्रलय'मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

'प्रलय' या चित्रपटाचे दिग्दर्शन हंसल मेहता यांचा मुलगा जय मेहता करणार आहे. जयने यापूर्वी 'स्कॅम १९९२' चे सह-दिग्दर्शन केले होते. या चित्रपटाची भव्यता पाहता याचे बजेट तब्बल ३०० कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे, रणवीर सिंहची प्रोडक्शन कंपनी देखील याची सह-निर्माती आहे. चित्रपटात उत्कृष्ट व्हिज्युअल इफेक्ट्स देण्यासाठी एक मोठी आंतरराष्ट्रीय टीम या प्रकल्पावर काम करणार आहे.

'प्रलय' या चित्रपटात रणवीर सिंहच्या विरुद्ध दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री कल्याणी प्रियदर्शन (Kalyani Priyadarshan) मुख्य भूमिकेत दिसणार आहे. कल्याणी ही दिग्गज दिग्दर्शक प्रियदर्शन यांची मुलगी असून, तिचा नुकताच प्रदर्शित झालेला 'लोका' हा चित्रपट सुपरहीट ठरला होता. आता रणवीर आणि कल्याणी यांची ही फ्रेश जोडी पडद्यावर काय कमाल करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. हंसल मेहता यांनी स्पष्ट केले की, 'प्रलय'ची झोम्बी कथा ही कोणत्याही पुस्तकावर आधारित नसून जय मेहता आणि विशाल कपूर यांनी ती स्वतंत्रपणे लिहिली आहे. चित्रपटाचे शुटिंग लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे.

Web Title : रणवीर सिंह कल्याणी प्रियदर्शन के साथ 'प्रलय' में दिखेंगे।

Web Summary : 'धुरंधर' की सफलता के बाद, रणवीर सिंह हंसल मेहता की 'प्रलय' में अभिनय करेंगे, जिसका निर्देशन उनके बेटे जय करेंगे। निर्देशक प्रियदर्शन की बेटी कल्याणी प्रियदर्शन इस ज़ोंबी थ्रिलर में रणवीर के विपरीत मुख्य भूमिका निभाएंगी। फिल्म की शूटिंग जल्द ही शुरू होगी।

Web Title : Ranveer Singh to star in 'Pralay' with Kalyani Priyadarshan.

Web Summary : After 'Dhurandhar' success, Ranveer Singh will star in Hansal Mehta's 'Pralay,' directed by his son, Jai. Kalyani Priyadarshan, daughter of director Priyadarshan, will play the lead opposite Ranveer in this zombie thriller. The film's shooting will begin soon.