रणवीर सिंग की टॉयलेट क्लिनरची बॉटल? ‘गली बॉय’ स्वत:च उडवतोय स्वत:ची टर
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2019 13:07 IST2019-04-19T13:07:02+5:302019-04-19T13:07:30+5:30
रणवीर सिंग त्याच्या अॅक्टिंगसोबत चित्रविचित्र फॅशन सेन्ससाठी ओळखला जातो. त्याचे अतरंगी पोशाख कायम चर्चेचा विषय ठरतात. अनेकांना त्याची ही स्टाईल आवडतेही. पण अनेक जण यावरून त्याला ट्रोलही करतात. पण यावेळी प्रकरण जरा वेगळे आहे.

रणवीर सिंग की टॉयलेट क्लिनरची बॉटल? ‘गली बॉय’ स्वत:च उडवतोय स्वत:ची टर
रणवीर सिंग त्याच्या अॅक्टिंगसोबत चित्रविचित्र फॅशन सेन्ससाठी ओळखला जातो. त्याचे अतरंगी पोशाख कायम चर्चेचा विषय ठरतात. अनेकांना त्याची ही स्टाईल आवडतेही. पण अनेक जण यावरून त्याला ट्रोलही करतात. पण यावेळी प्रकरण जरा वेगळे आहे. होय, रणवीरला दुस-या कुणी नाही तर त्याने स्वत:च स्वत:ला ट्रोल केले.
रणवीरने अलीकडे एक इन्स्ट्रा स्टोरी शेअर केली. यात तो ब्लू, रेड व व्हाईट कलरच्या ट्रॅकसूटमध्ये दिसतोय. आपल्या या आऊटफिटची रणवीरने टॉयलेट क्लिनरच्या बाटलीशी तुलना केली. ‘These Harpic bottels look lit af’, असे त्याने लिहिले. एकंदर काय तर स्वत:च स्वत:वर जोक करून घेतला. खरे तर स्वत:च स्वत:वर हसणे, यासाठी हिंमत लागते. रणवीरकडे ती आहे, असे म्हणायला हरकत नाही.
अलीकडे रणवीर त्याच्या अतरंगी फॅशन सेन्सबद्दल बोलला होता. मला माझी फॅशन आवडते. मी मुळात असाच आहे. कॉलेजच्या दिवसांतही मी असेच कपडे घालायचो. बॉलिवूडमध्ये नवा नवा आलो, तेव्हा मी लोकांच्या इच्छेनुसार, सुरक्षित पर्याय निवडले. कदाचित त्यावेळी मी टीकेला घाबरायचो. पण पुढे पुढे मी आहे तसा वागू लागलो. यानंतर माझी फॅशन जज केली जातेय, ही भीती कुठल्या कुठे पळून गेली, असे रणवीर या मुलाखतीत म्हणाला होता.
तूर्तास रणवीर सिंग ‘८३’ या चित्रपटात बिझी आहे. या चित्रपटात तो माजी क्रिकेटपटू कपिल देव यांची भूमिका साकारताना दिसणार आहे. कबीर खान दिग्दर्शित हा सिनेमा भारतीय विश्वचषक विजयाची कथा सांगणारा आहे. १९८३ मध्ये कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट टीमने विश्वचषक जिंकला होता. हीच विजयगाथा चित्रपटरूपात पडद्यावर येणार आहे. याशिवाय करण जोहरच्या ‘तख्त’ या चित्रपटातही तो दिसणार आहे.