फॅशनमुळे चर्चेत असणारा रणवीर कधीकाळी असा दिसायचा, सोशल मीडियावर फोटो व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2019 15:11 IST2019-07-26T15:11:25+5:302019-07-26T15:11:50+5:30
सध्याच्या तरूणाईलाही प्रत्येकबाबतीत स्वातंत्र्य हवं असतं. त्यामुळेच फक्त विचारांनीच नाही तर आपल्या स्टाइलबाबतही स्वतंत्रपणे विचार करणारा रणवीर तरूणींसोबतच तरूणांच्याही गळ्यातील ताईत आहे.

फॅशनमुळे चर्चेत असणारा रणवीर कधीकाळी असा दिसायचा, सोशल मीडियावर फोटो व्हायरल
सोशल मीडियावर सेलिब्रिटींचे जुने फोटो व्हायरल होत असतात. कधी कधी या फोटोंमध्ये हे सेलिब्रिटी ओळखताही येत नाहीत. सध्या अभिनेता रणवीर सिंहचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यांत रणवीर आपली मैत्रीण आणि व्हीजे पिया त्रिवेदीसोबत आहे. रणवीरने पियाला मोठ्या प्रेमाने मिठी मारली आहे. यांत रणवीरचा लूकही लक्षवेधी आहे. रणवीरचे केस मोठे असून त्याने क्लीन शेव केल्याचे दिसत आहे. बऱ्याचदा रणवीरची हटके फॅशन आणि स्टाइल चर्चेचा विषय बनते. अनेकदा त्याच्या कपड्यांवरून त्याची खिल्लीही उडवली जाते.
मात्र रणवीरला या गोष्टीचा काहीही फरक पडत नाही. त्याला जे आवडतं ते तो परिधान करतो. सध्याच्या तरूणाईलाही प्रत्येकबाबतीत स्वातंत्र्य हवं असतं. त्यामुळेच फक्त विचारांनीच नाही तर आपल्या स्टाइलबाबतही स्वतंत्रपणे विचार करणारा रणवीर तरूणींसोबतच तरूणांच्याही गळ्यातील ताईत आहे. एवढचं नाही तर, रणवीरची स्टाइल थोडी विचित्र असूनही अनेक लोकांचा तो स्टाइल आयकॉनही आहे.
काही दिवसांपूर्वी रणवीरने अभिनेता अक्षय कुमारसोबतचा बालपणीचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. यांत रणवीर हेअरस्टाईल हटके होती. या फोटोला रणवीरने फॅनबॉय क्षण म्हटलं होतं. रणवीरचे बालपणीचे फोटोपाहून त्याला सुरूवातीपासूनच आपल्या लूकर विविध प्रयोग करणं आवडत होतं हे समोर आलंय. सध्या रणवीर कबीर खान दिग्दर्शित ८३ या चित्रपटात काम करत आहे. यांत रणवीर माजी क्रिकेटर कपिल देव यांची भूमिका साकारत असून या भूमिकेला न्याय देण्यासाठी तो प्रचंड मेहनत घेतोय. वाढदिवसाच्या दिवशी त्याने चित्रपटातील आपल्या लूकचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. या फोटो रसिकांची पसंती मिळाली होती.