अरे बापरे एक नाही तर तब्बल 4 शेफची नजर रणवीरच्या डाएटवर, सगळा खटाटोप '83'साठी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2019 15:25 IST2019-07-18T15:22:40+5:302019-07-18T15:25:52+5:30
बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग सध्या '83'च्या शूटिंगमध्ये बिझी आहे. या सिनेमात तो कपिल देव यांची भूमिका साकरताना दिसणार आहे

अरे बापरे एक नाही तर तब्बल 4 शेफची नजर रणवीरच्या डाएटवर, सगळा खटाटोप '83'साठी
बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग सध्या '83'च्या शूटिंगमध्ये बिझी आहे. या सिनेमात तो कपिल देव यांची भूमिका साकरताना दिसणार आहे. या सिनेमातील रणवीरचा फर्स्ट लूक प्रेक्षकांच्या पसतीस उतरला आहे.
कपिल देव यांची भूमिका साकारण्यासाठी रणवीर कोणतीच कसर सोडत नाही आहे. या भूमिकेसाठी तो स्पेशल डाएट फॉलो करतोय. नवभारत टाईम्सच्या रिपोर्टनुसार, रणवीर हेवी प्रोटीनयुक्त आहार घेतोय. तसे तर रणवीरला भारतीय जेवण आवडतं मात्र आता त्याच्या आहारात सर्व पदार्थांचा सामवेश करण्यात आला आहे.लंडनमधील चार शेफ त्याच्या डाएटला मॉनिटर करत आहेत.
यात कपिल देव यांच्या पत्नीची भूमिका दीपिका पादुकोण साकारणार आहे. लग्नानंतर दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगचा हा पहिला सिनेमा आहे. '८३' हा सिनेमा भारतीय विश्वचषक विजयाची कथा सांगणारा असून १९८३ मध्ये कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट टीमने विश्वचषक जिंकला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन कबीर खान करत आहे.सध्या या सिनेमाची टीम लंडनला शूटिंग करतेय.
या चित्रपटाच्या टीममध्ये अनेक कलाकार असल्याने या चित्रपटाची टीम चित्रीकरणासोबत प्रचंड धमाल मस्ती करत आहे.आहेत. या चित्रपटात ताहिर राज भसीन सुनील गावस्करांच्या भूमिकेत, एमी ब्रिक बलविंदर संधूंच्या भूमिकेत, तमीळ अभिनेता जीवा कृष्णामचारी श्रीकांत यांच्या भूमिकेत, चिराग पाटील संदीप पाटील यांच्या भूमिकेत, आदिनाथ कोठारे दिलीप वेंगसरकर यांच्या भूमिकेत, धैर्य करवा रवी शास्त्री यांच्या भूमिकेत आणि साहिल खट्टर सैयद यांच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. हा सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षकांना १० एप्रिल २०२० पर्यंत वाट पाहावी लागणार आहे.