रणवीर सिंगला आवडते 'ही' मराठमोळी अभिनेत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2018 18:28 IST2018-10-15T18:22:03+5:302018-10-15T18:28:30+5:30

अमृता खानविलकरने तिच्या ट्विटर अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात रणवीर तिच्याबद्दल बोलतो आहे.

Ranveer Singh likes 'this' Marathi actress | रणवीर सिंगला आवडते 'ही' मराठमोळी अभिनेत्री

रणवीर सिंगला आवडते 'ही' मराठमोळी अभिनेत्री

ठळक मुद्देअमृता खानविलकर आणि रणवीर सिंग यांच्यात चांगली मैत्री'सुपर डान्सर महाराष्ट्र'मध्ये अमृता परीक्षकाच्या भूमिकेत


बॉलिवूडचा बाजीराव म्हणजेच अभिनेता रणवीर सिंगने आपल्या अभिनयाने व स्टाईल स्टेटमेंट रसिकांना चांगलीच भुरळ पाडली आहे. त्याचा चाहता वर्गदेखील खूप मोठा आहे. मात्र आता रणवीरने त्याला कोणती अभिनेत्री आवडते, हे सांगितले. तुम्हालाही ही अभिनेत्री कोण आहे, हे जाणून घेण्याची उत्सुकता असेल ना. रणवीरने दीपिका पादुकोणचे नाव न घेता चक्क एका मराठमोळ्या अभिनेत्रीचे नाव घेतले आहे. ही अभिनेत्री म्हणजे अमृता खानविलकर.

अमृता खानविलकरने तिच्या ट्विटर अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात रणवीर तिच्याबद्दल बोलतो आहे. तो व्हिडिओत म्हणाला की, 'मनोरंजन विश्वातली माझी सर्वांत आवडती अभिनेत्री आहे अमृता खानविलकर. ती अत्यंत सुंदर आणि प्रतिभावान आहे.' रणवीरने अमृतासाठी अचानक हा व्हिडिओ शूट का केला असेल असा प्रश्न तुम्हाला पडला असेल ना. यामागचे कारण म्हणजे अमृता 'सुपर डान्सर महाराष्ट्र' या रिअॅलिटी शोमध्ये परीक्षकांच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. या कार्यक्रमाची सुरुवात होत असल्याने रणवीरने तिला या व्हिडिओमार्फत शुभेच्छा दिल्या आहेत.



 

अमृता खानविलकर आणि रणवीर सिंग यांची खूप चांगली मैत्री आहे. त्यांची ही मैत्री पुन्हा एकदा या व्हिडिओतून पाहायला मिळाली.


'सुपर डान्सर महाराष्ट्र' या शोमध्ये अभिनेत्री अमृता खानविलकर आपल्या अनुभवांच्या गाठोड्यातून या छोट्या नृत्यकलाकारांना युक्तीच्या काय खास गोष्टी सांगणार हे पाहणे औत्सुक्याचं ठरणार आहे.त्यात या कार्यक्रमाचे तिसरे परीक्षक, विठ्ठल पाटील कोरिओग्राफरच्या नजरेतून या छोट्या कलाकारांचं परिक्षण करणार आहेत. तेव्हा आपापल्या क्षेत्रात तरबेज असणाऱ्या या त्रयीचे परीक्षण पाहण्यातही एक वेगळीच मजा येणार आहे.

Web Title: Ranveer Singh likes 'this' Marathi actress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.