अंबानींच्या इव्हेंटमध्ये रणवीरने दीपिकाला केलं Kiss, नेटकरी म्हणाले, 'इमेज सुधारण्यासाठी..'

By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2023 05:32 PM2023-11-01T17:32:51+5:302023-11-01T17:33:59+5:30

नुकतेच दोघंही मुकेश अंबानींच्या 'जियो वर्ल्ड प्लाझा' उद्घाटनाला दिसले.

Ranveer Singh kisses Deepika Padukone at Ambani s event netizens again trolled couple | अंबानींच्या इव्हेंटमध्ये रणवीरने दीपिकाला केलं Kiss, नेटकरी म्हणाले, 'इमेज सुधारण्यासाठी..'

अंबानींच्या इव्हेंटमध्ये रणवीरने दीपिकाला केलं Kiss, नेटकरी म्हणाले, 'इमेज सुधारण्यासाठी..'

बॉलिवूडचं पॉवर कपल रणवीर सिंह (Ranveer Singh) आणि दीपिका पदुकोण (Deepika Padukone) नुकतेच 'कॉफी विद करण' मध्ये सहभागी झाले होते. यामध्ये दीपिकाने केलेल्या काही खुलाश्यांमुळे हे कपल चांगलंच ट्रोल व्हायला लागलं होतं. आता नुकतेच दोघंही मुकेश अंबानींच्या 'जियो वर्ल्ड प्लाझा' उद्घाटनाला दिसले. यावेळी रणवीरने दीपिकाला गालावर किस केले. दोघं इमेज सुधरवण्याचा प्रयत्न करत आहेत अशी टीका नेटकरी करत आहेत.

काल 'जियो वर्ल्ड प्लाझा' येथे बॉलिवूड कलाकारांची मांदियाळी होती. यावेळी रणवीर सिंह ब्लॅक आऊटफिटमध्ये दिसला. तर दीपिकाही तिच्या फॅशनेबल लुकमध्ये दिसली. दीपिका सध्या तिच्या कॅज्युअल रिलेशनशिपवरील वक्तव्याने चर्चेत आली होती. तसंच दोघांचं रिलेशन फेक असल्याचीही चर्चा सुरु झाली. कॉफी विद करणमध्ये दीपिकाच्या त्या वक्तव्यावर रणवीर तिच्याकडे रागाने पाहत असल्याचं नेटकऱ्यांनी नोटीस केलं. आता या सर्व चर्चांवर रणवीरने पूर्णविराम लावत नीता अंबानींसमोरच दीपिकाला गालावर किस केलं. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

रणवीर सिंह आणि दीपिका २०१८ मध्ये लग्नबंधनात अडकले. त्यांच्या लग्नाचा व्हिडिओ कॉफी विद करणमध्ये पहिल्यांदाच दाखवण्यात आला. रणवीर सिंह आणि दीपिका जेव्हा एकमेकांना डेट करत होते तेव्हा दीपिका इतरांच्याही संपर्कात होती असा खुलासा तिने केला होता. याच वक्तव्यावरुन तिला प्रचंड ट्रोल करण्यात येत आहे.

Web Title: Ranveer Singh kisses Deepika Padukone at Ambani s event netizens again trolled couple

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.