Gully Boy फेम प्रसिद्ध रॅपरचा मृत्यू; वयाच्या २४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2022 17:56 IST2022-03-21T17:56:16+5:302022-03-21T17:56:51+5:30
Dharmesh parmar: काही वर्षांपूर्वी आलेला रणवीर सिंगच्या 'गली बॉय'मध्ये धर्मेशने एका ट्रॅकसाठी रॅप साँग गायलं होतं.

Gully Boy फेम प्रसिद्ध रॅपरचा मृत्यू; वयाच्या २४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
अभिनेता रणवीर सिंग याची मुख्य भूमिका असलेल्या गली बॉय (Gully Boy) या चित्रपटातील एका प्रसिद्ध रॅपरचा मृत्यू झाला आहे. धर्मेश परमार (Rapper Dharmesh Parmar)असं निधन झालेल्या रॅपरचं नाव असून वयाच्या अवघ्या २४ व्या वर्षी त्याने अखेरचा श्वास घेतला आहे. त्यामुळे सध्या कलाविश्वासह अनेकांना धक्का बसला आहे.
स्ट्रीट रॅपर कम्युनिटीमध्ये प्रसिद्ध असलेल्या धर्मेशचं कार अपघातात निधन झालं आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, त्याच्या बँडने त्याच्या मृत्यूच्या बातमीला दुजोरा दिला आहे. मात्र, त्याच्या कुटुंबीयांकडून याविषयी अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
एमसी तोडफोडचा बँड स्वदेसीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत धर्मेशला श्रद्धांजली वाहिली आहे. सोबतच त्यांनी एक पोस्टही शेअर केली आहे. 'तू कधी विसरला जाणार नाहीस, तू तुझ्या संगीतातून नेहमी जिवंत राहशील.' यावेळी त्यांनी धर्मेशच्या रॅपमधील काही ओळी देखील पोस्ट केल्या आहेत.
दरम्यान, काही वर्षांपूर्वी आलेला रणवीर सिंगच्या 'गली बॉय'मध्ये धर्मेशने एका ट्रॅकसाठी रॅप साँग गायलं होतं. तो खासकरुन गुजराती रॅपमुळे ओळखला जायचा. तसंच तो एमसी तोडफोड (MC TodFod) या नावानेही ओळखला जात होता.