‘गली बॉय’ रणवीर सिंगची उडी, चाहत्यांवर पडली भारी!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2019 10:27 IST2019-02-06T10:15:23+5:302019-02-06T10:27:53+5:30

रणवीर सिंग म्हणजे बॉलिवूडचा मोस्ट एनर्जेटिक अ‍ॅक्टर. रणवीर जिथे जातो, तिथे धूम करतो. अवती-भवतींच्यांना अगदी वेड लावतो. पण कधीकधी हा ‘जोश’ही भारी पडतोच. रणवीरसोबत नेमके हेच झाले आणि त्याच्या ‘डाय हार्ट’ चाहत्यांना याचे परिणाम भोगावे लागलेत.

ranveer singh energetic jumps on crowd during gully boy promotion some girls got hurt | ‘गली बॉय’ रणवीर सिंगची उडी, चाहत्यांवर पडली भारी!!

‘गली बॉय’ रणवीर सिंगची उडी, चाहत्यांवर पडली भारी!!

चाहत्यांवर भारी पडला रणवीर सिंगचा ‘जोश’!
रणवीर सिंग म्हणजे बॉलिवूडचा मोस्ट एनर्जेटिक अ‍ॅक्टर. रणवीर जिथे जातो, तिथे धूम करतो. अवती-भवतींच्यांना अगदी वेड लावतो. पण कधीकधी हा ‘जोश’ही भारी पडतोच. रणवीरसोबत नेमके हेच झाले आणि त्याच्या  ‘डाय हार्ट’ चाहत्यांना याचे परिणाम भोगावे लागलेत.
त्याचे झाले असे की, ‘गली बॉय’च्या एका प्रमोशनदरम्यान रणवीरचा उत्साह अगदी शिगेला पोहोचला होता. इतका की, या उत्साहाच्या भरात त्याने थेट समोर उभ्या गर्दीत उडी (क्राऊड सर्फिंग)घेतली. अचानक गर्दीत वरून उडी घेतल्याने त्याच्या अनेक चाहत्यांना इजा पोहोचली. रणवीरचा टाईमिंग चुकला आणि नेमक्या रणवीरला मोबाईलमध्ये कॅच करू पाहणा-या चार दोन तरूणींना दुखापत झाली. या घटनेचे काही फोटोही व्हायरल होत आहेत. यात रणवीरच्या अचानक उडी घेतल्याने काही मुली घाबरून खाली बसलेल्या दिसत आहेत.

या घटनेवरून रणवीर ट्रोलही होतोय. अनेकांनी त्याला असला बालिशपणा न करण्याचा सल्ला दिला आहे. रणवीर एक परिपक्व अभिनेता आहे. त्याला तसेच वागायला हवे, असे एका युजरने लिहिले आहे. विशेष म्हणजे, चाहत्यांनी असे कान टोचल्यावर रणवीरनेही मनाचा मोठेपणा दाखवत, यापुढे सावध असेल. तुमच्या प्रेमासाठी आणि सल्लयासाठी धन्यवाद, असे म्हटले आहे.







  रणवीरचा ‘गली बॉय’ हा चित्रपट येत्या १४ फेबु्रवारीला रिलीज होतोय. या चित्रपटात प्रथमच रणवीर व आलिया भट्टची जोडी प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसणार आहे. ‘गली बॉय’मध्ये रणवीर सिंग नावेद शेख(रॅपर नैजीचे खरे नाव नावेद शेख आहे) नामक युवकाची भूमिका साकारताना दिसणार आहे. ही भूमिका साकारण्यासाठी रणवीरने प्रचंड मेहनत घेतली. अगदी डिवाइन व नैजीसारख्या रॅपर्सकडून सुमारे १० महिने प्रशिक्षण घेतले. या चित्रपटाचे दिग्दर्शन जोया अख्तरने केले आहे.

Web Title: ranveer singh energetic jumps on crowd during gully boy promotion some girls got hurt