दीपिकाच्या आधी या अभिनेत्रीला डेट करत होता रणवीर सिंग, सेटवर सुरु झाले होते अफेअर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2020 16:05 IST2020-04-13T15:49:02+5:302020-04-13T16:05:19+5:30

सिनेमा बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला मात्र प्रेक्षकांना ही जोडी पसंतीस उतरली.

Ranveer singh dated with sonakshi sinha before deepika padukone gda | दीपिकाच्या आधी या अभिनेत्रीला डेट करत होता रणवीर सिंग, सेटवर सुरु झाले होते अफेअर

दीपिकाच्या आधी या अभिनेत्रीला डेट करत होता रणवीर सिंग, सेटवर सुरु झाले होते अफेअर

दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग हे बॉलिवूडमधील हॉट कपलपैकी एक आहेत. दीपिका पादुकोणशी लग्न करण्याच्या आधी रणवीर सिंगचे नाव सोनाक्षी सिन्हाशी जोडण्यात आले होते. बीटाऊनमध्ये हिरो-हिरोईनशी एकमेकांशी नाव जोडली जाणं हा काही नवा प्रकार नाही.  2013मध्ये आलेल्या लुटेरे सिनेमाच्यावेळी रणवीर आणि सोनाक्षीचे अफेअरची चर्चा चांगलीच रंगली होती. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगला गल्ला जमावला नाही मात्र प्रेक्षकांना ही जोडी पसंतीस उतरली. दोघांच्या अफेअरची चर्चा आणखी रंगली. 


पण मीडिया रिपोर्टनुसार दोघांच्या प्रेमामध्ये सोनाक्षीचे वडील शत्रुघ्न सिन्हा आले. रणवीरने देखील आपण दोघे फक्त एकमेकांचे चांगले मित्र असल्याचे सांगितले. मीडिया रिपोर्टनुसार लुटेरे सिनेमाच्या सेटवर दोघांमधील जवळीक वाढली. मात्र शत्रुघ्न सिन्हा याने हे नातं पसंत नसल्याने सोनाक्षी आणि रणवीरने आपले मार्ग बदलले. सध्या रणवीर सिंग दीपिका पादुकोणसोबत आपली हॅप्पीली मॅरिड लाईफ एन्जॉय करतो आहे. 


वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाले तर, वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाले तर, रणवीर सिंग '८३' सिनेमात दिसणार आहे. लॉकडाऊनमुळे या सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे. हा सिनेमा भारतीय विश्वचषक विजयाची कथा सांगणारा असून १९८३ मध्ये कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट टीमने विश्वचषक जिंकला होता. या सिनेमात कपिल देव यांची भूमिका रणवीर सिंग साकारणार आहे. 


 

Web Title: Ranveer singh dated with sonakshi sinha before deepika padukone gda