आदित्या चोप्राच्या पुढच्या चित्रपटात दिसणार रणवीर सिंग ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2018 12:54 IST2018-01-23T07:24:42+5:302018-01-23T12:54:42+5:30
रणवीर सिंग पद्मावत चित्रपटात अलाउद्दीन खिल्जीच्या भूमिकेत प्रेक्षकांनासमोर येणार आहे. या चित्रपटानंतर रणवीरकडे अनेक चित्रपटांची रिघ लागली आहे. यानंतर ...
.jpg)
आदित्या चोप्राच्या पुढच्या चित्रपटात दिसणार रणवीर सिंग ?
र वीर सिंग पद्मावत चित्रपटात अलाउद्दीन खिल्जीच्या भूमिकेत प्रेक्षकांनासमोर येणार आहे. या चित्रपटानंतर रणवीरकडे अनेक चित्रपटांची रिघ लागली आहे. यानंतर गलीबॉय आणि सिम्बामध्ये दिसणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार याशिवाय आणखीन एक चित्रपट रणवीरच्या हाती लागला आहे. डीएनएमच्या रिपोर्टनुसार आदित्य चोप्रा आपल्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगला लागला आहे आणि यात त्याला रणवीरला कास्ट करायचे आहे. रिपोर्टनुसार या चित्रपटाची शूटिंग 2019 मध्ये सुरु होणार आहे. रणवीरला या प्रोजेक्टची माहिती आहे आणि त्याच्या डेट्सनुसारच चित्रपटाचे शूटिंग सुरू करण्यात येणार आहे.
आदित्य चोप्रानेच रणवीर सिंगला बॉलिवूडमध्ये लाँच केले आहे. यशराज बॅनरच्या बँड बाजा बारात चित्रपटातून तिने आपल्या करिअरला सुरुवात केली आहे. सध्या रणवीर पद्मावत चित्रपटाच्या रिलीजचा वाट मोठ्या उत्सुकतेने बघतो आहे. यात राणीच्या भूमिकेत दीपिका पादुकोणने साकरली आहे. शाहिद कपूर राजा रतन सिंह म्हणजे राणी पद्मिनीच्या पतीच्या भूमिकेत आहे. तर रणवीर सिंग अल्लाउद्दिन खिल्जीच्या भूमिकेत आहे. रणवीर सिंग प्रथमच खलनायकाची व्यक्तिरेखा साकारणार आहे. अदिती राव हैदरीही या चित्रपटात झळकणार आहे. यानंतर रणवीर जोया अख्तरच्या ‘गली बॉय’मध्ये दिसणार आहे. काही दिवसांपूर्वी गली बॉयच्या सेटवरचे फोटो लीक झाले होते. ‘गली बॉय’मध्ये एका स्ट्रिट रॅपरची कथा असल्याचे कळतेय. जी एका रिअल लाईफ स्टोरीवर बेतलेली आहे. ही कथा गेल्या अनेक वर्षांपासून जोयाच्या डोक्यात होत्या. या चित्रपटासाठी आधी रणबीर कपूरचे नाव चर्चेत होते. यानंतर वरूण धवनच्या नावाचीही चर्चा झाली आणि सरतेशेवटी रणवीरच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. रणवीर व आलिया या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहेत. या चित्रपटात रणवीर व आलिया यांच्यासोबतच अभिनेत्री कल्की कोच्लिन ही सुद्धा एका महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. चर्चा खरी मानाल तर कल्की यात एका रॅपरच्या भूमिकेत दिसेल.
ALSO READ : २५ नाही २४ जानेवारीलाच प्रदर्शित होणार ‘पद्मावत’! वाद पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयात!!