रणवीर सिंग-संजय लीला भन्साळींचं बिनसलं? हा सुपरस्टार ठरला भांडणासाठी कारणीभूत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2025 11:59 IST2025-07-15T11:59:13+5:302025-07-15T11:59:50+5:30

Ranveer Singh and Sanjay Leela Bhansali : अभिनेता रणवीर सिंग आणि दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्यात मतभेद झाल्याच्या बातम्या समोर येत आहेत.

Ranveer Singh and Sanjay Leela Bhansali's are not friend anymore? This superstar was the reason for the fight | रणवीर सिंग-संजय लीला भन्साळींचं बिनसलं? हा सुपरस्टार ठरला भांडणासाठी कारणीभूत

रणवीर सिंग-संजय लीला भन्साळींचं बिनसलं? हा सुपरस्टार ठरला भांडणासाठी कारणीभूत

अभिनेता रणवीर सिंग (Ranveer Singh) आणि दिग्दर्शक संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) यांच्यात मतभेद झाल्याच्या बातम्या समोर येत आहेत. जर हे खरं असेल तर या बातमीनंतर अनेक चाहते दु:खी होऊ शकतात. रणवीर सिंग आणि संजय लीला भन्साळी हे बॉलिवूडमधील सर्वात आवडते अभिनेता-दिग्दर्शक जोडी मानले जातात. दोघांनीही 'गोलियों की रासलीला - राम लीला', 'बाजीराव मस्तानी' आणि 'पद्मावत' सारख्या चित्रपटांमध्ये त्यांच्या केमिस्ट्रीने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातलाच नाही तर अनेक पुरस्कारही जिंकले. चाहते या जोडीला पुन्हा एकदा एकत्र पाहू इच्छित असताना, बॉलिवूड कॉरिडॉरमधून येणाऱ्या या बातम्यांमुळे खळबळ उडाली आहे. अभिनेता रणवीर सिंग आणि दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या जोडीचं ब्रेकअप झाल्याचे वृत्त आहे. एका रिपोर्टमध्ये या दोघांच्या नात्याबद्दल अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत.

ज्येष्ठ पत्रकार सुभाष के झा यांच्या रिपोर्ट्सनुसार, रणवीर सिंग आणि संजय लीला भन्साळी यांच्यात भांडण झाल्याचे वृत्त आहे. दिग्दर्शकाने त्यांच्या आगामी 'लव्ह अँड वॉर' चित्रपटात रणवीर सिंगला मुख्य भूमिका न दिल्याने त्यांच्यात मतभेद झाले आहेत. आधी अशी चर्चा होती की रणवीर सिंग या चित्रपटात मुख्य भूमिका साकारेल, पण तसे झाले नाही. 

या कारणामुळे रणवीर आणि भन्साळींचं बिनसलं

मीडिया रिपोर्ट्सनुसार, दोघांमध्ये मोठी दरी निर्माण झाली आहे. भन्साळींनी त्यांच्या आगामी 'लव्ह अँड वॉर' चित्रपटात रणवीरला मुख्य भूमिका न दिल्याने त्यांचे बिनसले आहे. आधी असे म्हटले जात होते की रणवीर 'लव्ह अँड वॉर'मध्ये मुख्य भूमिका साकारेल, परंतु रणबीर कपूर, आलिया भट आणि विकी कौशल यांना चित्रपटात कास्ट करण्यात आले होते. वृत्तानुसार, रणवीरला चित्रपटात दुसऱ्या क्रमांकाची भूमिका ऑफर करण्यात आली होती, जी त्याने नाकारली आणि ही भूमिका विकी कौशलला मिळाली. मात्र, संजय लीला भन्साळी आणि रणवीर सिंग यांच्यातील या वादाच्या बातमीवर कोणतेही अधिकृत विधान देण्यात आलेले नाही. परंतु सिने क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते, रणवीर आणि भन्साळी सध्या तरी वेगळे झाले आहेत.

वर्कफ्रंट 
रणवीर सिंग शेवटचा २०२३ मध्ये करण जोहरच्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी'मध्ये आलिया भटसोबत मुख्य भूमिकेत दिसला होता. २०२४ मध्ये तो रोहित शेट्टीच्या 'सिंघम अगेन' मध्ये कॅमिओ रोलमध्ये दिसला होता. आता तो आदित्य धरच्या अॅक्शन ड्रामा 'धुरंधर'मध्ये दिसणार आहे, ज्याचा पहिला लूक त्याच्या वाढदिवशी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात संजय दत्त, आर. माधवन, अक्षय खन्ना आणि अर्जुन रामपाल देखील दिसणार आहेत. हा चित्रपट ५ डिसेंबर २०२५ रोजी प्रदर्शित होणार आहे.

Web Title: Ranveer Singh and Sanjay Leela Bhansali's are not friend anymore? This superstar was the reason for the fight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.