​रणवीर म्हणतो, मला लवकरच बाप व्हायचे आहे

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2016 20:20 IST2016-11-02T20:20:03+5:302016-11-02T20:20:03+5:30

बॉलिवूडमधील मोस्ट एलिजेबल बॅचलर पैकी एक रणवीर सिंगला लवकरच बाप व्हायचे आहे. माझी बायोलॉजीकल घडी मला यासाठी संकेत देत ...

Ranveer says, I want to be a father soon | ​रणवीर म्हणतो, मला लवकरच बाप व्हायचे आहे

​रणवीर म्हणतो, मला लवकरच बाप व्हायचे आहे

ong>बॉलिवूडमधील मोस्ट एलिजेबल बॅचलर पैकी एक रणवीर सिंगला लवकरच बाप व्हायचे आहे. माझी बायोलॉजीकल घडी मला यासाठी संकेत देत असल्याचे त्याने सांगितले आहे. एका मॅगझिनला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्याने आपल्या भावना व्यक्त करताना मला लवकरच बाप व्हावे असे वाटत असल्याचे सांगितले आहे.
 
रणवीर कपूर आपल्या फॅशन सेंससाठी ओळखला जातो तसाच तो आपल्या बिनधास्त बोलण्यासाठी देखील प्रसिद्ध आहे. त्याने यापूर्वी कथन केलेल्या अनेक गोष्टीमुळे तो चांगलाच चर्चेत आला आहे. आता त्याने माझी बाप होण्याची वेळ आली असल्याचे सांगून पुन्हा एकदा चर्चेत स्थान मिळविले आहे.

रणवीरला मुलाखती दरम्यान त्याच्या आयुष्यातील ‘नो स्ट्रिंग अटॅचमेंट’बद्दल विचारण्यात आले. याप्रश्नाच्या उत्तरात रणवीर म्हणाला, सर्वच आपल्या आयुष्यात अशा घटनांमधून जातात. मी काही एकटाच नव्हतो, एखादा व्यक्ती तुमच्या जीवनात येतो, तो काही बदल घडवून आणतो, तुम्हाला काहीतरी स्थैर्य हवे असते. आता मी अशा कमी वेळ टिकणाºया नात्यात राहू इच्छित नाही. मला वाटते माझी बाप होण्याची वेळ आली आहे. माझी शारीरिक घडी तसे संकेत देऊ लागली आहे. मला एक कौटुंबिक व्यक्ती व्हायचे आहे. मला मुलांबद्दल खूप प्रेम आहे. 



रणवीर सिंगने आपल्या भावना व्यक्त करताना त्याच्या मुलाची आई कोण असणार आहे याचा उल्लेख केला नाही. मात्र त्याने आपण लवकरच लग्न करणार असल्याचे संकेत दिले आहेत. रणवीर लग्नासाठी कुणाची निवड करतो हे अद्याप ठरले नसले तरी दीपिकाबद्दल त्याचे असलेले आकर्षण अद्याप कमी झालेले नाही हे तेवढेच खरे.

Web Title: Ranveer says, I want to be a father soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.