रणवीरने स्विकारला डिप्पीचा पुरस्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 08:12 IST2016-02-07T02:42:24+5:302016-02-07T08:12:24+5:30

रणवीर सिंग हा नेहमीच त्याच्या विचित्र अ‍ॅक्टींगने किंवा त्याच्या कॉमेडीच्या स्टाईलने चाहत्यांना हसवत असतो. नुकताच त्याच्या बाबतीत एक किस्सा ...

Ranveer receives a DP Declaration | रणवीरने स्विकारला डिप्पीचा पुरस्कार

रणवीरने स्विकारला डिप्पीचा पुरस्कार

वीर सिंग हा नेहमीच त्याच्या विचित्र अ‍ॅक्टींगने किंवा त्याच्या कॉमेडीच्या स्टाईलने चाहत्यांना हसवत असतो. नुकताच त्याच्या बाबतीत एक किस्सा झाला. त्याने एका अ‍ॅवॉर्ड फंक्शनमध्ये दीपिकाला देण्यात आलेला ‘वुमन आॅफ द ईअर’ हा पुरस्कार तिच्या वतीने स्विकारला. हो! तुम्ही वाचताय ते खरंय.. फेमिना ब्युटी अ‍ॅवॉर्ड्स २०१६ मध्ये दीपिका ‘एनएफबीए’ वुमन आॅफ द ईअर अ‍ॅवॉर्ड मध्ये नॉमिनी होती. तिला शूटिंग असल्याने ती या अ‍ॅवॉर्ड फंक्शनला उपस्थित राहू शकली नाही. म्हणून तिथे रणवीर सिंग उपस्थित राहणार असल्याने त्याने तिचा बॉयफ्रेंड या नात्याने हा पुरस्कार स्विकारला. पुरस्कार घेतल्यानंतर तो एका स्त्रीच्या बोलीभाषेत बोलला,‘ वॉव! वुमन आॅफ द ईअर!’ त्यानंतरच सर्व प्रेक्षक हसू लागले. त्यानंतर पुढे तो म्हणाला,‘टू बी आॅनेस्ट! वुमन आॅफ द ईअर - मला तिचा खुप अभिमान वाटतोय. ती खरंच खुप चांगली कलाकार आणि मुलगी आहे. मला तिचा अभिमान वाटतोय.’ 

Web Title: Ranveer receives a DP Declaration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.