​रणवीर-दीपिकाचा गूपचूप ‘रोका’?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2016 19:56 IST2016-07-06T11:29:55+5:302016-07-06T19:56:30+5:30

बॉलिवूडचा बबली बॉय रणवीर सिंह याचा आज (६ जुलै)वाढदिवस. आज रणवीर ३१ वर्षांचा झाला. या खास दिनी एकीकडे रणवीरला ...

Ranveer-Deepika's 'Gotcha' stopped? | ​रणवीर-दीपिकाचा गूपचूप ‘रोका’?

​रणवीर-दीपिकाचा गूपचूप ‘रोका’?

लिवूडचा बबली बॉय रणवीर सिंह याचा आज (६ जुलै)वाढदिवस. आज रणवीर ३१ वर्षांचा झाला. या खास दिनी एकीकडे रणवीरला चाहत्यांकडून भरभरून शुभेच्छा देत आहे. तर दुसरीकडे रणवीरने गूपचूप एन्गेजमेंट केल्याची बातमी आहे. होय, रणवीरने दीपिका पदुकोणसोबत गूपचूप एन्गेजमेंट केल्याची बातमी आहे. अर्थात रणवीर व दीपिका दोघेही सध्या तरी लग्नाच्या मूडमध्ये नाहीत. मुंबईच्या एका इंग्रजी टेबलॉइडने दिलेल्या बातमीनुसार, अलीकडे रणवीर व दीपिकात ब्रेकअपच्या बातम्या आल्या. पण असे काहीही नाही. रणवीर व दीपिका दोघांनीही या वर्षांच्या प्रारंभी कुटुंबीयांच्या उपस्थितीत एन्गेजमेंट उरकल्याची खबर आहे. पंजाबीत या विधीला ‘रोका’ म्हटले जाते. टेबलॉइडने दिलेल्या वृत्तानुसार, रणवीर व दीपिकाचे आई-वडील परस्परांना भेटले व त्यांनी रोका निश्चित केला. अर्थात येत्या दोन-तीन वर्षे तरी दीपिका व रणवीर लग्नाच्या मूडमध्ये नाही. अलीकडे झालेल्या आयफ अवार्ड शोदरम्यान दीपिकाने रणवीरला लव साइन विद फ्लार्इंग किस दिला होता, हे तर तुम्ही जाणताच...आता ‘रोका’ची बातमीही खरी ठरावी, आणखी आम्हा चाहत्यांना हवे तरी काय??

Web Title: Ranveer-Deepika's 'Gotcha' stopped?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.