रानू मंडलचे इंग्रजी ऐकून सगळेच झाले अवाक्; पत्रकाराला म्हणाली, Its Enough
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2019 15:45 IST2019-09-13T15:42:08+5:302019-09-13T15:45:33+5:30
रानूने बॉलिवूडसाठी गायलेले पहिले गाणे नुकतेच रिलीज झाले. ‘हॅपी हार्डी और हीर’ या चित्रपटातील या गाण्याच्या लॉन्चिंग इव्हेंटला रानू हजर होती.

रानू मंडलचे इंग्रजी ऐकून सगळेच झाले अवाक्; पत्रकाराला म्हणाली, Its Enough
काही दिवसांपूर्वीपर्यंत रेल्वे स्टेशनवर गात भीक मागणारी रानू मंडल आज एक बॉलिवूड स्टार आहे. रेल्वे स्टेशनवरून रानू थेट हिमेश रेशमियाच्या स्टुडिओमध्ये पोहोचली आणि तिने एक नाही तर तीन गाणी रेकॉर्ड केलीत. रानूने बॉलिवूडसाठी गायलेले पहिले गाणे नुकतेच रिलीज झाले. ‘हॅपी हार्डी और हीर’ या चित्रपटातील या गाण्याच्या लॉन्चिंग इव्हेंटला रानू हजर होती. यावेळी पत्रकारांनी रानूवर प्रश्नांचा भडीमार केला. पण रानूने प्रत्येक प्रश्नाला अगदी आत्मविश्वासाने उत्तर दिले. इतकेच नव्हे तर ‘इट्स इनफ’ असे सुनावत प्रश्न विचारणा-या पत्रकाराची क्षणभर बोलतीही बंद केली. या पत्रकाराने रानूला तिच्या मुलीबद्दल प्रश्न विचारला होता.
काही दिवसांपूर्वी रानूच्या मुलीने रानूचा मॅनेजर अतींद्र चक्रवर्तीवर गंभीर आरोप केले होते. अतींद्र चक्रवर्ती हा मला माझ्या आईला भेटू देत नाही, असे तिने म्हटले होते. इतकेच नाही तर अतींद्र माझ्या आईच्या पैशांचा गैरवापर करत असल्याचा आरोपही रानूच्या मुलीने केला होता.
पत्रकारपरिषदेत रानूला तिच्या मुलीच्या या आरोपांबद्दल प्रश्न विचारण्यात आला. यावर, ‘परिस्थितीमुळे ती मला इतक्या दिवस भेटायला येऊ शकली नाही. मी तिला मुळीच दोष देणार नाही. Its Enough, असे रानू म्हणाली. रानूला इंग्रजीत बोलताना पाहून अनेकांना आश्चर्य वाटले.
तू कधी सेलिब्रिटी बनशील असे वाटले होते का? असा प्रश्न रानूला विचारला असता ‘आप God पर बिलीव करते है, ’ असा उलट प्रश्न तिने केला. पत्रकाराने हो असे उत्तर दिल्यावर Thats Why असे रानू म्हणाली.
एकंदर काय तर, रानू दीची इंग्रजी आणि तिचा आत्मविश्वास पाहून प्रत्येकजण अवाक् झाला.