दुर्गा पूजेला राणी मुखर्जीने केला धुनुची डान्स, पण 'या' कारणाने झाली ट्रोल, Video व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2023 12:43 IST2023-10-23T12:42:39+5:302023-10-23T12:43:10+5:30
राणी मुखर्जीने ऑलिव्ह ग्रीन रंगाची टिश्यू सिल्क साडी नेसली होती

दुर्गा पूजेला राणी मुखर्जीने केला धुनुची डान्स, पण 'या' कारणाने झाली ट्रोल, Video व्हायरल
सध्या सगळीकडेच नवरात्रोत्सवाची धूम आहे. सेलिब्रिटींमध्येही नवरात्रीचा उत्साह दिसून येतोय. मुंबईच्या प्रसिद्ध नॉर्थ बॉम्बे दुर्गा पंडालमध्ये अभिनेत्री काजोल, राणी मुखर्जी यांची चर्चा असते. याठिकाणी दुर्गा पूजेसाठी अनेक बॉलिवूड कलाकार येतात. त्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहेत. अष्टमीच्या दिवशी राणी मुखर्जीने (Rani Mukherjee) पारंपारिक धुनुची डान्स केला. मात्र हा डान्स करताना ती ट्रोलही झाली आहे.
राणी मुखर्जीने ऑलिव्ह ग्रीन रंगाची टिश्यू सिल्क साडी नेसली होती. यामध्ये तिचं सौंदर्य खुललं होतं. तिच्या लुककडे पाहून चाहत्यांची नजरच हटत नाहीए. यावेळी ती दुर्गा मातेच्या मूर्तीसमोर पारंपारिक धुनुची नृत्य करताना दिसली. मात्र सोबतच ती ट्रोलही झाली आहे. ' अरे भाई आधी ते पेटव तरी' असं म्हणत नेटकऱ्यांनी तिला चूक दाखवून दिली आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
याशिवाय राणीला तिच्या लुकवरुनही ट्रोल केलं गेलं. 'कसा ब्लाऊज घातला आहे' असं म्हणत तिच्यावर काही नेटकऱ्यांनी निशाणा साधला. तर चाहत्यांनी मात्र तिच्या लुकचं कौतुक केलं. या दुर्गा पंडालमध्ये अनेक सेलिब्रिटींनी धुनुजी नृत्य करत संस्कृतीचं दर्शन घडवलं. काजोल, सुमोना चक्रवर्ती, सुश्मिता सेन या देखील यंदा नृत्य करताना दिसल्या.