​ श्रीदेवींची ‘ती’ इच्छा आता कधीच पूर्ण करू शकणार नाही राणी मुखर्जी...!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2018 10:34 IST2018-02-28T05:04:45+5:302018-02-28T10:34:45+5:30

श्रीदेवींच्या अकाली निधनाने बॉलिवूडसह देशभरातील त्यांचे चाहते शोकाकूल आहेत. अभिनेत्री राणी मुखर्जी ही सुद्धा श्रीदेवींच्या निधनाने दु:खी आहे. पुढच्या ...

Rani Mukherjee can never fulfill Sridevi's 'she' wish! | ​ श्रीदेवींची ‘ती’ इच्छा आता कधीच पूर्ण करू शकणार नाही राणी मुखर्जी...!

​ श्रीदेवींची ‘ती’ इच्छा आता कधीच पूर्ण करू शकणार नाही राणी मुखर्जी...!

रीदेवींच्या अकाली निधनाने बॉलिवूडसह देशभरातील त्यांचे चाहते शोकाकूल आहेत. अभिनेत्री राणी मुखर्जी ही सुद्धा श्रीदेवींच्या निधनाने दु:खी आहे. पुढच्या महिन्यात राणीचा वाढदिवस आहे. पण श्रीदेवींच्या निधनामुळे दु:खी असलेल्या राणीने यंदा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. श्रीदेवींच्या अचानक जाण्याने मला प्रचंड धक्का बसला आहे. माझे त्यांच्यासोबत वेगळेच नाते होते. त्या केवळ माझ्या आवडत्या अभिनेत्री नव्हत्या तर माझ्या अतिशय जवळच्या व्यक्ती होत्या. त्यांच्या जाण्याने बॉलिवूडचे कधीही भरून न निघणारे नुकसान झाले आहे. दुबईला जाण्यापूर्वीच माझी व श्रीदेवींची भेट झाली होती. यावेळी त्यांनी माझा ‘हिचकी’ हा आगामी चित्रपट बघण्याची इच्छा व्यक्त केली होती. मला तुझा हा चित्रपट बघायचा आहे, असे त्या मला म्हणाल्या होत्या. त्यावर, चित्रपट अद्याप पूर्णपणे तयार नाही, तुम्ही लग्नावरून परत या, मग मी तुम्हाला चित्रपट दाखवेल, असे मी त्यांना म्हणाले होते. पण आता त्या माझा चित्रपट कधीच पाहू शकणार नाहीत. त्यांची ही इच्छा मी पूर्ण करू शकले नाही, याचे मला आयुष्यभर दु:ख राहील, असे राणी म्हणाली.

ALSO READ : LIVE UPDATE: ​अलविदा ‘चांदनी’! श्रीदेवींच्या अंत्यदर्शनासाठी चाहत्यांची गर्दी!!

गत शनिवारी दुबईतील हॉटेलात श्रीदेवींचा बाथटबमध्ये बुडून अपघाती मृत्यू झाला होता. दुबईतील सगळा तपास पूर्ण झाल्यानंतर काल रात्री उशीरा त्यांचे पार्थिव मुंबईत आणण्यात आले. यानंतर विमानतळावरून ते थेट त्यांच्या लोखंडवालास्थित ग्रीन एकर्स येथे आणले गेले. आज सकाळी ते जवळच्याच सेलिब्रेशन स्पोर्ट्स क्लबमध्ये अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले आहे.   दुपारी २ वाजता तेथून अंत्ययात्रा निघेल. पवनहंसजवळील विलेपार्ले स्मशानभूमीत श्रीदेवी यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होतील.
 

Web Title: Rani Mukherjee can never fulfill Sridevi's 'she' wish!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.