Exclusive : राणी मुखर्जीचा 'मर्दानी2' मधला सेटवरचा फोटो आऊट
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2019 16:30 IST2019-04-10T16:27:39+5:302019-04-10T16:30:42+5:30
राणी मुखर्जीने मर्दानी2 चे शूटिंग मार्च महिन्यात सुरु केले आहे. या सिनेमातील पहिला फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Exclusive : राणी मुखर्जीचा 'मर्दानी2' मधला सेटवरचा फोटो आऊट
राणी मुखर्जीने मर्दानी2 चे शूटिंग मार्च महिन्यात सुरु केले आहे. या सिनेमातील पहिला फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यानंतर आता राणीचा सेटवरचा नवा फोटो व्हायरल झाला आहे. यात राणी पोलीस अधिक्षकांच्या भूमिकेत दिसणार आहे. २१ वर्षीय खलनायकाशी राणीचा सामना होताना दिसणार आहे. दिग्दर्शक गोपी पुथरन या सीक्वलचे दिग्दर्शन करणार आहेत. गोपी यांनीच ‘मर्दानी’ची पटकथा लिहिली होती. राणीचा पती आदित्य चोप्रा या सीक्वलची निर्मिती असणार आहे.
यशराज बॅनरचा मालक आदित्य चोप्रा ‘मर्दानी 2’ प्रोड्यूस करतोय. गोपी पुथरन हे या चित्रपटाचे दिग्दर्शक आहे. गोपी पुथरन यांनीच या चित्रपटाची स्क्रिप्ट लिहिली आहे. २०१९ च्या अखेरिस हा सिनेमा रिलीजसाठी सज्ज असण्याची शक्यता आहे. २०१४ साली राणीची प्रमुख भूमिका असलेला 'मर्दानी' सिनेमा प्रदर्शित झाला होता.
यासिनेमातून अभिनेता चंकी पांडे याचा पुतण्या अहान पांडे याचा बॉलिवूड डेब्यू अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. अहान त्यांनाच असिस्ट करणार आहे. काही दिवसांपूर्वी अहान व अभिनेत्री अमायरा दस्तूर यांच्या डेटींगच्या बातम्या अशाच चर्चेत आल्या होत्या.
अहान व अमायरा दोघेही पार्टी करायचे, एकमेकांसोबत फिरायचे, सोबत स्नूकर खेळायचे, रात्र-रात्र एकमेकांशी बोलायचे. पण आता अहानच्या आयुष्यात ‘मिस वर्ल्ड’च्या मुकूटावर नाव कोरणारी मानुषी छिल्लर हिने एन्ट्री घेतल्याची चर्चा आहे.