राणी मुखर्जीचा 'मर्दानी ३' बॉक्स ऑफिसवर धुवांधार! बिग बजेट सिनेमांना देतोय टक्कर, दुसऱ्याच दिवशी कमाई डबल
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2026 16:20 IST2026-02-01T16:19:39+5:302026-02-01T16:20:20+5:30
बॉक्स ऑफिसवरही 'मर्दानी ३' हा सिनेमा धुरंधर आणि बॉर्डर २सारख्या बिग बजेट सिनेमांना चांगली टक्कर देत आहे. 'मर्दानी ३'चं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर आलं असून या सिनेमाने दोनच दिवसात चांगली कमाई केली आहे.

राणी मुखर्जीचा 'मर्दानी ३' बॉक्स ऑफिसवर धुवांधार! बिग बजेट सिनेमांना देतोय टक्कर, दुसऱ्याच दिवशी कमाई डबल
राणी मुखर्जी मुख्य भूमिकेत असलेला 'मर्दानी ३' सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला आहे. यश राज फिल्म्सची हिट फ्रँचायझी असलेल्या 'मर्दानी'च्या तिसऱ्या भागालाही प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. बॉक्स ऑफिसवरही 'मर्दानी ३' हा सिनेमा धुरंधर आणि बॉर्डर २सारख्या बिग बजेट सिनेमांना चांगली टक्कर देत आहे. 'मर्दानी ३'चं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर आलं असून या सिनेमाने दोनच दिवसात चांगली कमाई केली आहे.
पहिल्याच दिवशी 'मर्दानी ३'ने सर्व अपेक्षा फोल ठरवत मर्दानी फ्रँचायझीतील आजवरची सर्वात मोठी ओपनिंग नोंदवली होती. यासोबतच हा राणी मुखर्जीचा सर्वात मोठा सोलो ओपनर ठरला. पहिल्या दिवशी ४ कोटी रुपयांची कमाई करत, भारतातील महिला-प्रधान चित्रपटांसाठी या चित्रपटाने एक अत्यंत प्रभावी आणि ऐतिहासिक सुरुवात केली. सामाजिक संदेश असलेला हा थ्रिलर आता आशयप्रधान आणि समाजावर परिणाम करणारे चित्रपट पाहणाऱ्या प्रेक्षकांसाठी ‘मस्ट वॉच’ ठरला आहे. या सिनेमाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये दुसऱ्या दिवशी तब्बल ५० टक्क्यांची जोरदार वाढ झाली आहे. शनिवारी 'मर्दानी ३'ने 6 कोटी रुपये नेट कमावले आहेत. यामुळे चित्रपटाची दोन दिवसांची एकूण कमाई १० कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे.
सिनेमाघरांमध्ये राणी मुखर्जीची स्टार अपील निर्विवाद आहे. एक सोलो लीडिंग लेडी म्हणून ती सातत्याने प्रेक्षकांना थिएटरमध्ये खेचत आहे. आपल्या कारकिर्दीच्या ३०व्या वर्षात असा यशस्वी टप्पा गाठणे ही एक दुर्मिळ कामगिरी असून, यामुळे तिची टिकाऊ बॉक्स ऑफिस विश्वासार्हता पुन्हा एकदा ठामपणे सिद्ध झाली आहे.