केरळच्या पुरात अडकली होती राणी मुखर्जीच्या ‘या’ हिरोची आई, अशी केली सुटका!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2018 19:47 IST2018-08-17T19:43:04+5:302018-08-17T19:47:23+5:30
केरळमध्ये पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पूरप्रभावित भागातील बचाव कार्याचे अनेक फोटो समोर येत आहेत. यातला एक फोटो लक्षवेधी ठरला आहे.

केरळच्या पुरात अडकली होती राणी मुखर्जीच्या ‘या’ हिरोची आई, अशी केली सुटका!!
केरळमध्ये पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे़ राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये पुराने हाहाकार माजला आहे़ किनारपट्टीलगतच्या भागातही पूरस्थितीने भीषण रूप धारण केले आहे. राज्यात आत्तापर्यंत पुराने १६७ बळी घेतले आहेत. पूरप्रभावित भागातील बचाव कार्याचे अनेक फोटो समोर येत आहेत.
यातला एक फोटो लक्षवेधी ठरला आहे. होय,या फोटोत पुरात अडकलेल्या एका महिलेला सुरक्षित बाहेर काढले जात आहे. ही महिला दुसरी-तिसरी कुणी नसून मल्याळम चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार पृथ्वीराज सुकुमारन याची आई आहे. बॉलिवूडच्या ‘अय्या’ या चित्रपटात पृथ्वीराज राणी मुखर्जीच्या अपोझिट दिसला होता. २०१२ मध्ये हा चित्रपट रिलीज झाला होता.
पृथ्वीराज सुकुमारनची आई मल्लिका सुकुमारन हे सुद्धा मल्याळम चित्रपटसृष्टीतील एक मोठे नाव आहे. मल्लिका यांनाही तिरूवनंपूरममधील पूराचा फटका बसला. पृथ्वीराजच्या घरात पाणी भरले. यानंतर त्याच्याघरातील सदस्यांना बाहेर काढले गेले. फोटोत मल्लिका एका मोठ्या टबमध्ये बसलेल्या आहेत.पृथ्वीराजच्या आईला तर सुरक्षित बाहेर काढले गेले. पण अद्यापही केरळातील शेकडो लोक पुरात फसलेले आहेत. या लोकांना बाहेर काढण्यासाठी निरंतर बचाव कार्य सुरू आहे.