पुन्हा एक सीक्वल! राणी मुखर्जी पुन्हा बनणार ‘मर्दानी’!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2018 13:01 IST2018-12-10T12:59:53+5:302018-12-10T13:01:07+5:30
जेव्हा केव्हा चुलबुल पांडे व बाजीराव सिंघम पडद्यावर आलेत, तेव्हा तेव्हा प्रेक्षकांनी त्यांना प्रचंड प्रेम दिले. आता राणी मुखर्जी ही सुद्धा या यादीत येणार आहे. होय, बॉलिवूडची गुणी अभिनेत्री राणी लवकरच ‘मर्दानी’ या आपल्या गाजलेल्या चित्रपटाचा सीक्वल घेऊन येणार आहे

पुन्हा एक सीक्वल! राणी मुखर्जी पुन्हा बनणार ‘मर्दानी’!
बॉलिवूड इंडस्ट्रीत सध्या हिट सिनेमांचे सीक्वल आणण्याची चढाओढ दिसतेय. यापैकी अनेक सीक्वलही हिट होतात तर काही दणकून आपटतात. पण पोलिस ड्रामा असलेले सीक्वल मात्र कायम हिट ठरले आहेत. सलमान खानची ‘दबंग’ सीरिज असो वा अजय देवगणची ‘सिंघम’ सीरिज याचे एक उत्तम उदाहरण आहे. जेव्हा केव्हा चुलबुल पांडे व बाजीराव सिंघम पडद्यावर आलेत, तेव्हा तेव्हा प्रेक्षकांनी त्यांना प्रचंड प्रेम दिले. आता राणी मुखर्जी ही सुद्धा या यादीत येणार आहे. होय, बॉलिवूडची गुणी अभिनेत्री राणी लवकरच ‘मर्दानी’ या आपल्या गाजलेल्या चित्रपटाचा सीक्वल घेऊन येणार आहे. या चित्रपटात राणीने महिला पोलिस अधिकाºयाची भूमिका साकारली होती.
#RaniMukerji's next is #Mardaani2pic.twitter.com/Pr28zGrEKQ
— Yash Raj Films (@yrf) December 10, 2018
आज ट्रेड एक्स्पर्ट तरण आदर्श यांनी आपल्या सोशल अकाऊंटवर ‘मर्दानी 2’ची घोषणा केली. राणी मुखर्जी लवकरच ‘मर्दानी 2’ घेऊन येतेय, असे त्यांनी जाहिर केले. राणीनेही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. ‘मर्दानी’ माझा आवडता चित्रपट आहे. हा रिलीज झाला तेव्हाच ‘मर्दानी 2’ कधी येणार, असे लोकांनी विचारणे सुरु केले होते. आता ‘मर्दानी 2’ची घोषणा झालीय. मला आशा आहे की, चाहत्यांना यामुळे आनंद होईल, असे राणी म्हणाली.
दिग्दर्शक गोपी पुथरन या सीक्वलचे दिग्दर्शन करणार आहेत. गोपी यांनीच ‘मर्दानी’ची पटकथा लिहिली होती. राणीचा पती आदित्य चोप्रा या सीक्वलचा निर्माता असेल. येत्या नववर्षात ‘मर्दानी 2’चे शूटींग सुरु होणार आहे. म्हणजे, २०१९ च्या अखेरिस हा चित्रपट रिलीजसाठी सज्ज असेल.
२०१४ साली राणीची प्रमुख भूमिका असलेला ‘मर्दानी ’ चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात पोलिसाच्या भूमिकेत असलेली राणी सर्वांनाच खूप भावली होती. बॉक्स आॅफिसवर हा चित्रपट सुपरहिट ठरलाच पण त्याचबरोबर राणीच्या अभिनयाचंही खूप कौतुक झालं.