एकीकडे 'मर्दानी ३' ची क्रेझ असताना राणी मुखर्जीचा 'हा' सिनेमा OTT वर ट्रेंडिंग! सस्पेन्स अन् ट्विस्ट पाहून थरकाप उडेल
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2026 14:03 IST2026-02-02T13:56:28+5:302026-02-02T14:03:55+5:30
सस्पेन्स, ट्विस्ट अन् थरार! एकीकडे 'मर्दानी ३'ची क्रेझ असताना राणी मुखर्जीचा 'हा' सिनेमा 'OTT' गाजवतोय

एकीकडे 'मर्दानी ३' ची क्रेझ असताना राणी मुखर्जीचा 'हा' सिनेमा OTT वर ट्रेंडिंग! सस्पेन्स अन् ट्विस्ट पाहून थरकाप उडेल
Rani Mukerjee Cinema: ओटीटी माध्यमामुळे प्रेक्षकांसाठी एक मनोरंजनाचं नवं द्वार खुलं झालं आहे. हल्ली जगभरातील कंटेन्ट ओटीटी प्लॅटफॉर्ममुळे फोनवर सहज पाहता येतो. अलिकडच्या काळातील ट्रेंड पाहिल्यास सिनेरसिकांमध्ये हॉरर आणि सस्पेन्स थ्रिलर सिनेमे, सीरिजबद्दल सर्वात जास्त क्रेझ आहेत.अशातच आता नव्या सीरिज, चित्रपटांपेक्षा कधीकधी जुने चित्रपट प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहेत. असाच एक सिनेमा ओटीटीप्रेमींमध्ये चर्चेत आला आहे. सात वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेला हा सिनेमा थिएटरनंतर आता ओटीटीवर प्रेक्षकांना खेचून आणत आहे. कोणता आहे हा चित्रपट जाणून घेऊया...
डिजीटल प्लॅटफॉर्मवर सर्वाधिक चर्चेत असलेल्या या चित्रपटाचं नाव मर्दानी २ आहे. हा क्राइम थ्रिलर चित्रपट २०१९ मध्ये प्रदर्शित झाला होता. बॉलीवूड हंगामाच्या रिपोर्टनुसार, २७ कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने जगभरात जवळपास ६७ कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केली. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता.
कथानक
‘मर्दानी-२’मध्ये राणी एका इन्स्पेक्टरची भूमिका साकारली आहे. हा चित्रपट एका सत्य घटनेवर आधारित आहे. या चित्रपटाची कथा १ तास ४३ मिनिटे लांब आहे आणि ती एका वेड्या सिरीयल किलरभोवती फिरते. या चित्रपटात कुख्यात गुन्हेगार मुलींचे अपहरण करतो, त्यांच्यावर बलात्कार करतो आणि नंतर त्यांची निर्घृण हत्या करतो, असं दाखवण्यात आलं आहे. पोलिस या मारेकऱ्याला पकडण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतात, पण मारेकरी त्यांच्या तावडीत सापडत नाही.या प्रकरणाचा तपास करण्याची जबाबदारी अधिकारी शिवानी शिवाजी रॉयवर आहे. चित्रपटात अभिनेत्री राणी मुखर्जीने ही भूमिका साकारली आहे.
हा चित्रपट सध्या नेटफ्लिक्सवर ७ व्या क्रमांकावर ट्रेंड करत आहे.या चित्रपटातील कथा आणि राणी मुखर्जीचा अभिनय प्रेक्षकांना प्रचंड आवडला होता.राणी मुखर्जीने मर्दानी फ्रँचायझीचा एक चेहरा बनली आहे. सध्या आता एकीकडे राणीच्या मर्दानी ३ ची प्रेक्षकांमध्ये चर्चा असताना सात वर्षांपूर्वीच्या या सिनेमाला ओटीटीवर पुन्हा एकदा पसंती मिळताना दिसते आहे.