Rangoon Screening : डीप नेक टाइट सूट परिधान केलेल्या कंगना राणौतचा पहा हॉट अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2017 15:51 IST2017-02-22T10:21:15+5:302017-02-22T15:51:15+5:30

कंगना राणौत, सैफ अली खान आणि शाहिद कपूर स्टारर ‘रंगून’ या सिनेमाच्या स्क्रीनिंगचे नुकतेच आयोजन केले होते. बॉलिवूडमधील अनेक ...

Rangoon Screening: Deep Purple Kite Legend Watch | Rangoon Screening : डीप नेक टाइट सूट परिधान केलेल्या कंगना राणौतचा पहा हॉट अंदाज

Rangoon Screening : डीप नेक टाइट सूट परिधान केलेल्या कंगना राणौतचा पहा हॉट अंदाज

गना राणौत, सैफ अली खान आणि शाहिद कपूर स्टारर ‘रंगून’ या सिनेमाच्या स्क्रीनिंगचे नुकतेच आयोजन केले होते. बॉलिवूडमधील अनेक तारे-तारकांनी या स्क्रीनिंगला हजेरी लावली होती. मात्र सर्वांच्या नजरा खिळून राहिल्यात त्या ‘रंगून’च्या कंगना राणौतवर. कंगनाने परिधान केलेला डीप नेक तिच्या सौंदर्यात चार चॉँद लावणारा ठरला. 



काळ्या रंगाचा हा सूट कंगनाची ठळकपणे उपस्थिती दर्शविणारा ठरला असला तरी, कंगना मात्र या सूटमध्ये खूपच अनकम्फर्टेबल असल्याचे बघावयास मिळत होते. कारण हा सूट तिला अधिकच टाइट होत असल्याने ती यामध्ये अनकम्फर्ट असल्याचे बघावयास मिळत होते. मात्र काहीही असो या सूटमुळे तिचे सौंदर्य कमालीचे खुलून दिसत होते.



या स्क्रीनिंगला दुसरा चर्चेत राहिलेला चेहरा म्हणजे रणदीप हुड्डा हा होय. कारण त्याला बघितल्यानंतर ‘हा रणदीप हुड्डा आहे की आणखी कोण’ असा प्रश्न पडल्याशिवाय राहात नव्हता. लांब केस आणि दाढी वाढविलेला रणदीपचा हा न्यू लूक जबरदस्त डॅशिंग दिसत होता. या लूकमध्ये तो खूपच डिफरेंट दिसत होता. या लूकमुळे तो पार्टीत टॉकिंग प्वाइंट बनला होता. असे म्हटले जात आहे की, त्याच्या आगामी सिनेमासाठी त्याने हा लूक धारण केला आहे. 



यावेळी स्क्रीनिंगला दिग्दर्शक विशाल भारद्वाज, आनंद एल. राय, राकेश ओमप्रकाश मेहरा, विदु विनोद चोपडा, विकास बहल आदि दिग्गज उपस्थित होते. त्याव्यतिरिक्त बॉलिवूडमधील अनेक तारे-तारकांनीही स्क्रीनिंगला उपस्थिती लावली होती. 

Web Title: Rangoon Screening: Deep Purple Kite Legend Watch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.